देवेंद्र फडणवीस सरकारसाठी धोक्याची घंटा? विधानसभा अध्यक्षाची निवडणूक ठरणार गेम चेंजर

देवेंद्र फडणवीस सरकारसाठी धोक्याची घंटा? विधानसभा अध्यक्षाची निवडणूक ठरणार गेम चेंजर

भाजपला 145 बहुमताचा आकडा गाठता आला नाही तर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार पडू शकतं

  • Share this:

मुंबई, 25 नोव्हेंबर: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच कोर्टात आहे. शनिवारी झालेल्या शपथविधीविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांनी संयुक्त याचिका दाखल केली होती. यासंदर्भात सोमावरी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष निवडीचं सर्वात मोठं आव्हान भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससमोर पक्षांसमोर असणार आहे. शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या घडामोडीनंतर शनिवारी संध्याकाळी अजित पवारांवर कारवाई करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदावरुन त्याची हकालपट्टी करण्यात आली. त्यांचे गटनेतेपदाचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची निवड करण्यात आली.

वाचा- अजित पवारांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी होणार? शरद पवारांनी दिलं उत्तर

एका कायदेतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, 'अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी नाहीत. त्यामुळे व्हिपचा किंवा ते पक्षातील आमदारांना कोणतेही आदेश देऊ शकत नाहीत. त्यांनी केलेल्या कारवाईचा कोणताही परिणाम होऊ शकणार नाही. हा अधिकार केवळ विधिमंडळ गटनेतेपदाला असतो.'

विधानसभेचा अध्यक्ष हे निवडून आलेले सर्वात वरिष्ठ मानले जातात. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विधानसभा अध्यक्षांना गोपनीय शपथ देतात. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष स्वत: सोडून उरलेल्या 287 आमदारांना शपथ गोपनीयतेची देतात.

वाचा- पोलिसांवर विश्वास नाही.. राष्ट्रवादीच्या आमदारांवर शिवसेनेचा 'वॉच'

शपथविधीविरोधातील याचिकेवर सुनावणी होत आहे. दरम्यान फोर्ट टेस्ट घेतल्यानंतरही भाजपला बहुमत न मिळाल्यास भाजपचं सरकार पडू शकतं.

170 आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे असा दावा भाजपने केला आहे. सध्या भाजपकडे असलेल्या संख्याबळाचा विचार करता 105 भाजपचे आमदार 18 अपक्ष आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे. आता 145 बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपला आणखी 25 आमदारांची आवश्यकता आहे. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि राकांपाने 165 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. दोन्ही पक्षांनी केलेल्या दाव्याची संख्या आणि एकूण विधासनभेचे सदस्य यांच्यात ताळमेळ लागत नसल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. त्यामुळे विधानसभा अध्याक्षाची निवड होतानाच खरं काय ते समोर येऊ शकेल. असंही विश्लेषक सांगतात.

एकूण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महाविकासआघाडीने राज्यपाल कोश्यारींकडे बहुमत असल्याचं पत्र सादर केलं आहे. तर दुसरीकडे कोर्टात असलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. यासगळ्या पार्श्वभूमीवर भाजपला अग्निपरीक्षेत यश मिळेल का? भाजप बहुमताचा आकडा गाठू शकेल का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला नाही तर सरकार बरखास्त करावं लागले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 25, 2019 10:39 AM IST

ताज्या बातम्या