Home /News /maharashtra /

चाणक्य कुठे चुकले? राष्ट्रवादीला पत्ताच नाही हे शक्य आहे का? खरा डावपेच कुणाचा

चाणक्य कुठे चुकले? राष्ट्रवादीला पत्ताच नाही हे शक्य आहे का? खरा डावपेच कुणाचा

महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप आला आहे. शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे महाविकासआघाडी सरकार अडचणीत सापडलं आहे. एकीकडे राज्यात सत्ता नाट्य सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 22 जून : महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप आला आहे. शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे महाविकासआघाडी सरकार अडचणीत सापडलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता आहे, पण या सगळ्या घडामोडींमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचे चाणक्य कुठे चुकले, राष्ट्रवादीच्या गृहखात्याला या सगळ्याचा पत्ताच नाही का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मुंबईतून आमदार बाहेर गेले कसे? सोमवारी विधान परिषद निवडणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन गुजरातमध्ये गेले, यामध्ये शिवसेना आणि त्यांच्या सहयोगी मंत्र्यांचाही समावेश आहे. आमदार आणि मंत्र्यांना राज्याच्या पोलिसांची सुरक्षा असते, मग पोलिसांनी गृहखातं आणि मुख्यमंत्र्यांना याबाबात अलर्ट का केलं नाही? दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) यांच्याकडे असलेलं गृहखातं अपयशी का ठरलं? अशा वेगवेगळ्या चर्चा सोशल मीडियावर उपस्थित होत आहेत. दुसरीकडे आज सिल्व्हर ओकवर झालेल्या बैठकीत शरद पवार (Sharad Pawar) यांनी गृहखात्याच्या अपयशाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. एकनाथ शिंदेंचं बंड उशीरा लक्षात आलं? एकनाथ शिंदे एवढं मोठं बंड करणार होते, तर याबाबतची रणनिती बऱ्याच आधीपासून आखली असेल, मग राज्याच्या इंटलिजन्स डिपार्टमेंटला याचा थांगपत्ताही कसा लागला नाही, हादेखील प्रश्न आहे. शरद पवार-मुख्यमंत्री भेट नाही 2019 साली अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर शरद पवार लगेचच ऍक्शन मोडमध्ये आले आणि त्यांनी राष्ट्रवादीमधलं बंड मोडून काढलं. यावेळी मात्र शरद पवार कुठेच ऍक्शनमध्ये दिसले नाहीत. सोमवारी रात्री शिवसेनेचे आमदार नॉट रिचेबल झाल्यानंतरही शरद पवार मंगळवारी उशीरा मुंबईत आले, तसंच त्यांची आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटही झाली नाही. शिवसेनेचे आमदार सूरतला गेल्यानंतर हा शिवसेनेचा अंतगर्त प्रश्न आहे, असं सांगून राष्ट्रवादीने हात झटकून घेतले का? अशा वेगवेगळ्या कॉन्सिपरसी थिअरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Maharashtra politics, NCP, Uddhav thackeray, शरद पवार. sharad pawar

    पुढील बातम्या