Home /News /maharashtra /

सकाळी राऊतांचं वक्तव्य मग मुख्यमंत्र्यांची साद, शिवसेना बॅकफूटवर का वेगळीच स्ट्रॅटजी?

सकाळी राऊतांचं वक्तव्य मग मुख्यमंत्र्यांची साद, शिवसेना बॅकफूटवर का वेगळीच स्ट्रॅटजी?

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde Shivsena) गटाबाबत बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांची भाषाच बदलली, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी या आमदारांना भावनिक साद घातली. शिवसेनेने ही स्ट्रॅटजी का बदलली असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 28 जून : सुप्रीम कोर्टाने सोमवारी महाराष्ट्राच्या (Maharashtra Politics) सत्तानाट्याबाबत महत्त्वाचा निकाल दिला. 12 जुलैपर्यंत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातल्या नोटीस पाठवण्यात आलेल्या 16 आमदारांवर कोणतीही कारवाई विधानसभा उपाध्यक्षांनी करू नये, असा आदेश कोर्टाने दिला. सुप्रीम कोर्टाच्या या आदेशानंतर रोज आक्रमक भाषेचा वापर करणाऱ्या संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज भाषाच बदलली. सकाळी संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेचे आमदारच नाही तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाही आवाहन केलं. यानंतर दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनीही पुन्हा एकदा आमदारांना भावनिक साद घातली. काय म्हणाले उद्धव ठाकरे? आपल्यातील बरेच जण संपर्कात आहेत, तुम्ही अजूनही मनाने शिवसेनेत आहात, तसंच आमदारांच्या कुटुंबातल्या काहींनी संपर्क साधून मनातल्या भावना कळवल्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो , कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही , माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे , आपण या माझ्या समोर बसा , शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा , यातून निश्चित मार्ग निघेल, असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी आमदारांना दिला. याचसोबत कोणाच्या भूल थापांना बळी पडू नका, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं. राऊत बॅकफूटवर कालपर्यंत आक्रमक विधानं करणाऱ्या संजय राऊत यांनी तर आज थेट देवेंद्र फडणवीस यांचंच कौतुक केलं. 'देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहे. त्यांच्याकडे 106 आमदारांचं बळ आहे. इतका मोठा आमदारांचा गट महाराष्ट्रात कधी निर्माण झाला नाही. हा गट महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतो, ही आमची कायम भूमिका आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये तशी क्षमता आहे. त्यांनी या डबक्यात उतरू नये, असा मित्र म्हणून माझा फडणवीसांना सल्ला आहे,' असं राऊच म्हणाले. 'एकनाथ शिंदे हे आता ही येऊ शकतात. एकनाथ शिंदे हे अजूनही कार्यकारणीमध्ये आहे. उद्धव ठाकरे यांनीच त्यांना पक्षाचे गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. ते आमचे मित्र आहे, सहकारी आहे. अयोध्येला ते माझ्यासोबत होते. त्यांच्याविषयी माझ्या मनात अजिबात व्यक्तिगत राग नाही, त्यांची व्यक्तिगत लढाई आहे, त्यांनी महाराष्ट्रात यावे, असं आवाहनही राऊत यांनी केलं. मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना फोन? संजय राऊत आणि मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहानाच्या मध्येच उद्धव ठाकरे यांनी 21 आणि 22 जूनला देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याची वृत्त प्रसिद्ध झाली. या बातम्या आल्यानंतर शिवसेनेने असा कोणताही फोन केला नसल्याचं स्पष्टीकरण दिलं. कनव्हिन्स नाही तर कनफ्यूज करा? if you cant convince then lets confuse हे वाक्य इंग्रजीमध्ये अनेकदा वापरलं जातं. कालपर्यंत गुवाहाटीमध्ये बसलेल्या आमदारांना अनेक प्रकारे समजावूनदेखील कोणताच मार्ग निघत नव्हता. त्यामुळे गुवाहाटीतील आमदारच आमच्या संपर्कात आहेत, फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये फोनवर बोलणं झाल्याचं सांगून कनव्हिन्स होत नसलेल्या आमदारांना कनफ्यूज करण्याची तर शिवसेनेची स्ट्रॅटेजी नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena, Uddhav thackeray

    पुढील बातम्या