• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • महाविकासआघाडीला धक्का, उद्याच होणार बहुमत चाचणी, सुप्रीम कोर्टाचा निकाल

महाविकासआघाडीला धक्का, उद्याच होणार बहुमत चाचणी, सुप्रीम कोर्टाचा निकाल

महाराष्ट्रातल्या सत्तनाट्याचा (Maharashtra Politics) निकाल आज संध्याकाळी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) लागणार आहे.

 • News18 Lokmat
 • | June 29, 2022, 21:15 IST
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:50 (IST)

  उद्धव ठाकरे थोड्याच वेळात राजभवनवर
  राज्यपाल कोश्यारींचं उद्धव ठाकरेंना आमंत्रण
  'महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन होईपर्यंत...'
  'काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळा'
  राज्यपाल उद्धव ठाकरेंना अधिकृत पत्र देणार 

  22:23 (IST)

  महाविकास आघाडी सरकार कोसळलं
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा राजीनामा
  उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
  विधान परिषद आमदारकीचाही राजीनामा
  मुख्यमंत्रिपदाचा त्याग करतोय - उद्धव ठाकरे
  'ज्यांना सत्तेची लालसा आहे त्यांना ती भोगू द्या'
  'कुणाकडे किती बहुमत यामध्ये रस नाही'
  'शिवसेना कुणीही हिरावून घेऊ शकत नाही'
  पुन्हा शिवसेना भवनात बसणार - उद्धव ठाकरे
  फक्त शिवसेनेची धुरा सांभाळणार - उद्धव ठाकरे
  तळागाळातले शिवसैनिक माझ्यासोबत - उद्धव
  मी पुन्हा येईन असं बोललो नव्हतो - उद्धव ठाकरे
  राज्यपालांनी उद्धव ठाकरेंचा राजीनामा स्वीकारला
  ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजपचा जल्लोष
  भाजप नेत्यांकडून जोरदार घोषणाबाजी

  महाविकास आघाडी सरकार कोसळलं
  उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
  'कामाची सुरुवात गड-किल्ल्यांना निधी देऊन'
  'आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले'
  शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं - उद्धव ठाकरे
  'पवार आणि सोनियांनी मोठं सहकार्य केलं'
  'चांगलं सुरू असलेल्या कामाला दृष्ट लागली'
  'रिक्षावाले, टपरीवाल्यांना नगरसेवक, मंत्री केलं'
  'बाळासाहेब ठाकरेंनी अनेकांना मोठं केलं'
  'ज्यांना आजपर्यंत दिलं, तेच नाराज झाले'
  'कुणाकडे किती बहुमत यामध्ये रस नाही'
  'तळागाळातले शिवसैनिक माझ्यासोबत उभे'
  सुप्रीम कोर्टाचा निकाल मान्य - उद्धव ठाकरे
  'शिवसैनिकांनी कुठलाही गोंधळ घालू नये'
  'आमदारांच्या मार्गात कुणीही येणार नाही'
  मी पुन्हा येईन असं बोललो नव्हतो - उद्धव ठाकरे 

  21:12 (IST)

  महाविकासआघाडीला सगळ्यात मोठा धक्का, उद्याच होणार बहुमत चाचणी, सुप्रीम कोर्टाचा निकाल

  21:0 (IST)

  तिन्ही पक्षांचे वकील कोर्टरूममध्ये दाखल

  20:59 (IST)

  सुप्रीम कोर्टाचा निकाल आता अवघ्या काही मिनिटांमध्ये, महाराष्ट्राचं राजकीय भवितव्य ठरणार

  20:30 (IST)

  मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी विवेक फणसाळकर 

  20:28 (IST)

  साडेतीन तास तिन्ही पक्षांचे युक्तीवाद झाले. रात्री 9 वाजता सुप्रीम कोर्ट निकाल देणार

  20:20 (IST)

  राज्यपाल हे देवदूत नसतात, तेही माणूसच असतात- अभिषेक मनु सिंघवी

  20:13 (IST)

  जर राज्यपाल हा राजकीय व्यक्ती नसेल तर मग  विधानसभा अध्यक्ष हा कसा राजकीय व्यक्ती होऊ शकतो असा सवाल अभिषेक सिंघवी यांनी केला आहे

  20:10 (IST)

  नबाम राबिया या प्रकरणात लागू होते, हे सूचित करते की हे फ्लोर टेस्टचे प्रकरण नाही: सिंघवी

  नवी दिल्ली, 29 जून : महाराष्ट्रातल्या सत्तनाट्याचा (Maharashtra Politics) निकाल आज संध्याकाळी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) लागणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी उद्या विशेष अधिवेशन बोलवून ठाकरे सरकारला बहुमत चाचणीला सामोरं जायला सांगितलं आहे, पण राज्यपालांच्या या आदेशाविरोधात सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आहे.