Home /News /maharashtra /

एकनाथ शिंदेंचं गुवाहाटीतून शक्तीप्रदर्शन, 42 मधले सेनेचे किती? स्वतंत्र गटासाठी अजूनही पुरेसे आमदार नाहीतच

एकनाथ शिंदेंचं गुवाहाटीतून शक्तीप्रदर्शन, 42 मधले सेनेचे किती? स्वतंत्र गटासाठी अजूनही पुरेसे आमदार नाहीतच

शिवसेनेत बंड केलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde Shivsena) यांनी गुवाहाटीतून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत असलेल्या 42 आमदारांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

    मुंबई, 23 जून : शिवसेनेत बंड केलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde Shivsena) यांनी गुवाहाटीतून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत असलेल्या 42 आमदारांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, यामध्ये शिवसेनेचे 35 आणि अपक्ष 7 आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांना वेगळा गट स्थापन करण्यासाठी शिवसेनेच्या 37 आमदांची गरज आहे, म्हणजेच शिंदे यांना अजून 2 आमदारांची गरज आहे. यातले दादा भुसे (Dada Bhuse) हे गुवाहाटीच्या दिशेने निघाले आहेत, ते संध्याकाळपर्यंत तिथे पोहोचतील असं सांगितलं जात आहे, त्यामुळे शिंदेंना आणखी एका आमदाराची गरज आहे. शिवसेनेच्या चिन्हावर विधानसभेत 55 आमदार आहेत, पक्षांतर बंदी कायद्यातून वाचण्यासाठी दोन-तृतियांश आमदार सोबत असणं गरजेचं आहे. त्यामुळे दोन-तृतियांशच्या आकडेवारीनुसार एकनाथ शिंदेंना 37 चा आकडा गाठणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदेंसोबतचे शिवसेनेचे आमदार 1 महेंद्र मोरे 2 भरत गोगवले 3 महेंद्र दळवी 4 अनिल बाबर 5 महेश शिंदे 6 शहाजी पाटील 7 शंभूराजे देसाई 8 ज्ञानराज चौघुले 9 रमेश बोरणारे 10 तानाजी सावंत 11 संदीपान भुमरे 12 अब्दुल सत्तार 13 प्रकाश सुर्वे 14 बालाजी कल्याणकर 15 संजय शिरसाट 16 प्रदीप जयस्वाल 17 संजय रायमुलकर 18 संजय गायकवाड 19 एकनाथ शिंदे 20 विश्वनाथ भोईर 21 शांतराम मोरे 22 श्रीनिवास वनगा 23 प्रकाश अबिटकर 24 चिमणराव पाटील 25 सुहास कांदे 26 किशोरअप्पा पाटील 27 प्रताप सरनाईक 28 यामिनी जाधव 29 लता सोनावणे 30 बालाजी किणीकर 31 गुलाबराव पाटील 32 योगेश कदम 33 सदा सरवणकर 34 दीपक केसरकर 35 मंगेश कुडाळकर अपक्ष आमदार 1 राजकुमार पटेल, प्रहार 2 बच्चू कडू, प्रहार 3 नरेंद्र बोंडेकर, अपक्ष 4 राजेंद्र पाटील येड्रावकर, अपक्ष 5 चंद्रकांत पाटील, अपक्ष 6 मंजुळा गावित, अपक्ष 7 आशिष जयस्वाल, अपक्ष
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena, Uddhav thackeray

    पुढील बातम्या