मुंबई, 28 जून : एकनाथ शिंदे (Eknath Shinde Shivsena) यांनी बंड केल्यामुळे महाराष्ट्रातलं महाविकासआघाडी (Mahavikas Aghadi) सरकार अडचणीत आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 39 आमदार आणि अपक्ष असे मिळून जवळपास 50 आमदार आहेत. हे सगळे आमदार गुवाहाटीमध्ये आहेत. आमदारांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज भावनिक आवाहन केलं, पण या आवाहनाचा परिणामही झालेला नाही. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनानंतर एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
आता वेळ निघून गेली आहे. आम्ही आमचं म्हणणं दोन वर्ष मुख्यमंत्र्यांना सांगत आलोय, पण काहीच दखल घेतली गेली नाही. याचा सर्वाधिक फायदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने घेतला आहे, असं एकनाथ शिंदे न्यूज18 लोकमतशी बोलताना म्हणाले.
सकाळी राऊतांचं वक्तव्य मग मुख्यमंत्र्यांची साद, शिवसेना बॅकफूटवर का वेगळीच स्ट्रॅटजी?
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे
आपल्यातील बरेच जण संपर्कात आहेत, तुम्ही अजूनही मनाने शिवसेनेत आहात, तसंच आमदारांच्या कुटुंबातल्या काहींनी संपर्क साधून मनातल्या भावना कळवल्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो , कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही , माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे , आपण या माझ्या समोर बसा , शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा , यातून निश्चित मार्ग निघेल, असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी आमदारांना दिला. याचसोबत कोणाच्या भूल थापांना बळी पडू नका, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.