मुंबई, 22 जून : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला आणखी एक धक्का दिला आहे. शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत, असं ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
शिवसेनेमध्ये (Shivsena) बंड झाल्यानंतर आता पक्षाने आमदारांवर कारवाईचा बडगा उगारायला सुरूवात केली आहे. काल शिवसेनेने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं गटनेतेपद काढून घेतलं, यानंतर आता शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू (Sunil Prabhu) यांनी शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि महेश शिंदे (Mahesh Shinde) यांना नोटीस पाठवली आहे. आज संध्याकाळी 5 वाजता वर्षा निवासस्थानी शिवसेनेची बैठक बोलावण्यात आली आहे, या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश या नोटीसमध्ये देण्यात आले आहेत.
या बैठकीला हजर न राहिल्यास स्वेच्छेने शिवसेना पक्षाचे सदस्यत्व सोडणार असल्याचे समजून आपल्यावर भारतीय संविधान सदस्याच्या अपात्र संदर्भात असलेल्या तरतुदीनुसार कारवाई करणार असल्याचा इशारा या दोघांना देण्यात आला आहे.

शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांच्या सहीने ही नोटीस शिवसेना आमदारांना देण्यात आली आहे, पण आता एकनाथ शिंदे यांनी ही नोटीस अवैध असल्याचं सांगितलं आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे शिवसेनेचे दोन तृतियांशपेक्षा जास्त आमदार आहेत, त्यामुळे हा व्हीप लागू होणार नसल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.