Home /News /maharashtra /

आता देवेंद्र फडणीवस नॉट रिचेबल! महाराष्ट्रातली राजकीय उलथापालथ शेवटच्या टप्प्यात

आता देवेंद्र फडणीवस नॉट रिचेबल! महाराष्ट्रातली राजकीय उलथापालथ शेवटच्या टप्प्यात

महाराष्ट्रातल्या सत्ता नाट्याचा थरार आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. कारण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मीडियासाठी नॉट रिचेबल असल्याचं वृत्त आहे.

    मुंबई, 23 जून : महाराष्ट्रातल्या सत्ता नाट्याचा थरार आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. कारण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मीडियासाठी नॉट रिचेबल असल्याचं वृत्त आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीस शेवटचा धक्का द्यायच्या तयारीत आहेत का? अशा चर्चांना उधाण आलं आहे. भाजपची एकनाथ शिंदेना ऑफर? भाजपकडून शिंदे गटाला उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली आहे. याशिवाय 12 मंत्रिपदांची ऑफरही त्यांच्या गटाला आहे. त्यामुळे सध्या सहा मंत्रिपदं असलेल्या शिंदे गटाल एकूण मंत्रिमंडळाच्या 25 टक्के हिस्सा देण्याची ऑफर भाजपकडून असल्याचं बोललं जात आहे. 42 शिवसेना आमदार आणि ८ अपक्ष असे एकूण 50 जण शिंदे गटात सहभागी होणार असल्याचं समोर येत आहे. संध्याकाळपर्यंत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपल्या या शिवसेना गटाचं पत्र देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याआधी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. मागच्या 12 तासांमध्ये शिवसेनेचे 8-10 आमदार गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. तर आणखी काही आमदार दाखल होण्याची प्रतिक्षा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला आहे. मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar), सदा सरवणकर (Sada Sarvankar) हे शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेले आमदार तर आशिष जयस्वाल हे अपक्ष आमदार काही वेळापूर्वीच गुवाहाटीला पोहोचले आहेत. याआधी काल रात्री गुलाबराव पाटील आणि योगेश कदम हे शिवसेनेचे आमदार तसंच मंजुळा गावित, चंद्रकांत पाटील हे अपक्ष आमदार गुवाहाटीमध्ये पोहोचले. दुसरीकडे दादा भुसे (Dada Bhuse), दीपक केसरकर (Deepak Kesarkar), संजय राठोड (Sanjay Rathod) आणि दिलीप लांडे (Dilip Lande)हे नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळत आहे. पक्षांतर बंदी कायद्याच्या कारवाईतून वाचायचं असेल तर शिंदे गटामध्ये शिवसेनेचे दोन-तृतियांश आमदार असणं गरजेचं आहे. म्हणजेच शिवसेनेच्या 55 आमदारांपैकी 37 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणं गरजेचं आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: BJP, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Shivsena, Uddhav thackeray

    पुढील बातम्या