Home /News /maharashtra /

सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी मुख्यमंत्री मंत्रालयात, ठाकरे सरकारची शेवटची कॅबिनेट मीटिंग?

सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी मुख्यमंत्री मंत्रालयात, ठाकरे सरकारची शेवटची कॅबिनेट मीटिंग?

महाराष्ट्रातल्या सत्तनाट्याचा (Maharashtra Politics) निकाल आज संध्याकाळी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) लागणार आहे. त्याआधी मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात पोहोचले आहेत.

    मुंबई, 29 जून : महाराष्ट्रातल्या सत्तनाट्याचा (Maharashtra Politics) निकाल आज संध्याकाळी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) लागणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी उद्या विशेष अधिवेशन बोलवून ठाकरे सरकारला बहुमत चाचणीला सामोरं जायला सांगितलं आहे, पण राज्यपालांच्या या आदेशाविरोधात सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी आज संध्याकाळी 5 वाजता सुरू होणार आहे. एकीकडे थोड्याच वेळात सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीला सुरूवात होत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात पोहोचले आहेत. मंत्रालयामध्ये थोड्याच वेळात मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री त्यांच्या वर्षा बंगल्यावरून मंत्रालयाकडे येण्यासाठी निघाले. मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे आणि अनिल परब हे एकाच गाडीमध्ये होते. मंत्रालयाबाहेर लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. मंत्रालयात पोहोचताच मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये औरंगाबादचं (Aurangabad) नामकरण संभाजीनगर (Sambhaji Nagar) करण्याचा प्रस्ताव ठेवला जाण्याची शक्यता आहे. कालच संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी हा प्रस्ताव ठेवला जाईल, असं सांगितलं होतं. राज्यामध्ये सत्तासंकट असताना औरंगाबादचं संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला महाविकासआघाडीतले घटकपक्ष असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय भूमिका घेणार, याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. काँग्रेसने याआधी अनेकवेळा औरंगाबादच्या नामांतराला विरोध केला होता.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Shivsena, Uddhav thackeray

    पुढील बातम्या