Home /News /maharashtra /

साऊथ मुंबई महाराष्ट्राच्या सत्ता नाट्याचं केंद्र, 3 किमीमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!

साऊथ मुंबई महाराष्ट्राच्या सत्ता नाट्याचं केंद्र, 3 किमीमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेमध्ये (Shivsena) उभी फूट पडली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे मोठ्याप्रमाणावर आमदार असल्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) राजीनामा देण्याची शक्यता आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 22 जून : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेमध्ये (Shivsena) उभी फूट पडली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे मोठ्याप्रमाणावर आमदार असल्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) राजीनामा देण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही हेच संकेत दिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास, विधानसभा बरखास्तीच्या दिशेने, असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे. महाराष्ट्राच्या या सत्तानाट्याचं केंद्र दक्षिण मुंबई झालं आहे, पुढच्या काही तासांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे. पेडर रोडच्या सिल्व्हर स्टोन येथे कमलनाथ आणि एचके पाटील यांच्यात काँग्रेस नेत्यांची बैठक सूरू आहे, तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि नेत्यांची वाय.बी.चव्हाण सेंटरला भेट घेत आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक 1 वाजता बोलावली आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री राजीनामा देण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला तर त्यांच्या राजीनाम्याच पत्र राजभवनला पाठवण्यात येईल. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोना झाल्यामुळे ते रुग्णालयात दाखल आहेत, पण मुख्यमंत्र्यांचा राजीनामा राजभवनचं कार्यालय स्वीकारेल, अशी माहिती आहे. उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी शिवसेनेचे आमदार, खासदार आणि प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे, या बैठकीत भविष्याबाबत काय निर्णय घ्यायचा याबाबत चर्चा केली जाणार आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena, Uddhav thackeray

    पुढील बातम्या