Home /News /maharashtra /

मुख्यमंत्र्यांचं Live अर्धा तास खोळंबल्यानंतरही पेच कायम, आता शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष

मुख्यमंत्र्यांचं Live अर्धा तास खोळंबल्यानंतरही पेच कायम, आता शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जनतेची संवाद साधण्याची घोषणा केली, पण मुख्यमंत्र्यांचा हा संवाद सुरू व्हायला अर्धा तास उशीर झाला.

    मुंबई, 22 जून : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जनतेची संवाद साधण्याची घोषणा केली, पण मुख्यमंत्र्यांचा हा संवाद सुरू व्हायला अर्धा तास उशीर झाला. या फेसबूक लाईव्हमध्ये मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या बंडखोरांना भावनिक साद घातली, पण अजूनही पेच कायम आहे. आता शरद पवार (Sharad Pawar) सुप्रिया सुळे, जयंत पाटील मुख्यमंत्र्यांना भेटायला जात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या संवादानंतर आता शरद पवार काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागलं आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री? -- हिंदुत्व हा शिवसेना श्वास. शिवसेना आणि हिंदुत्व हे एकमेकांमध्ये गुंफलेलं आहे. हिंदुत्वाबद्दल विधानसभेत बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री. असं काय केलं की हिंदुत्वापासून दूर गेलो असं वाटलं? आधीही शिवसेना हिंदुत्त्ववादी आताही हिंदुत्ववादीच आहे. -सत्तेच्या अडीच वर्षात जे मिळालं ते बाळासाहेबांनीच दिलं -आपल्या माणसांना शोधावं लागणं ही कसली लोकशाही? -शरद पवारांनी सांगितलं म्हणून मुख्यमंत्रीपद स्वीकारलं. शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी विश्वास टाकला. प्रशासननंही मला सांभाळले -काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा माझ्यावर अजूनही विश्वास आहे. आजच कमलनाथ यांच्यासोबत बोलणं झालं. -माझ्याच लोकांना मी मुख्यमंंत्रीपदी नको असेल तर काय करायचं? गुजरातला जाऊन बोलायची काय गरज आहे. मुख्यमंत्री नको असं मला सांगावं मी राजीनामा देण्यास तयार आहे. ज्यांना मी नकोय त्यांनी समोर येऊन सांगावे, मी पद सोडायला तयार आहे. मी आजच मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हलवणार आहे. -आज मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करत आहे. गायब आमदारांनी समोर येऊन माझ्या राजीनाम्याचं पत्र राज्यपालांना द्यावं. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर राजीनामा देण्यास तयार आहे. कोरोना नसता तर मीच राजीनामा घेऊन गेलो असतो. -शिवसैनिकांनी सांगावं मी शिवसेना पक्षप्रमुख पदासाठी योग्य नाही, मी शिवसेना प्रमुखपद सोडण्यास तयार आहे. -शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असल्यास आनंदच आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Shivsena, Uddhav thackeray

    पुढील बातम्या