Home /News /maharashtra /

'हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावानं मतं मागा', उद्धव ठाकरेंचे एकनाथ शिंदेंना आव्हान 

'हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावानं मतं मागा', उद्धव ठाकरेंचे एकनाथ शिंदेंना आव्हान 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यातील संघर्ष आता आणखी चिघळला आहे

    मुंबई, 25 जून : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यातील संघर्ष आता आणखी चिघळला आहे. शिंदे गट त्यांच्या पक्षाला बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नाव देणार असल्याचं वृत्त समोर आलं होतं. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत या विषयावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. शिंदे यापूर्वी नाथ होते, आता दास झाले आहेत, असा टोला त्यांनी लगावला. त्याचबरोबर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा कुणीही वापर करू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत सांगितले की, 'शिंदे यापूर्वी नाथ होते. पण, त्यांनी स्वत:चाच पक्ष शिवसेनेला धोका दिला आहे. त्यांनी भाजपाशी संगनमत केले असून ते आता भाजपाचे दास झाले आहे. त्यांच्यात हिंमत असेल तर पक्षाचे नाव तुमच्या वडिलांच्या नावावर ठेवा आणि मत मागा. तुम्हाला कोण मतं देतो ते पाहूया,' असे आव्हान ठाकरे यांनी यावेळी दिले. 3 मोठे ठराव मंजूर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सर्व अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आले असून बैठकीत 3 मोठे ठराव मंजूर करण्यात आले आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेतील सर्व प्रकारचे निर्णय घेणारे सर्व अधिकारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेच असतील, असे पहिल्या ठरावात म्हटले आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव कोणालाही वापरता येणार नाही, असा दुसरा ठराव आहे. तर  पक्षातील गद्दारांवर कारवाई करण्याचे अधिकार पक्षप्रमुखांनाही असतील, असा तिसरा ठरावही सर्वानुमते मान्य करण्यात आला आहे. आता माफी नाही! शिवसेनेनं बजावला एकनाथ शिंदेंना समन्स यापूर्वी शिवसेनेनं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं गटनेतेपद काढून घेतलं, त्यानंतर शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू (Sunil Prabhu) यांनी शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि महेश शिंदे (Mahesh Shinde) यांना नोटीस पाठवली होती. आता शिंदे यांना साथ देणाऱ्या मंत्र्यांची मंत्रिपदही धोक्यात आली आहेत.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena, Uddhav thackeray

    पुढील बातम्या