Home /News /maharashtra /

औरंगाबादचं संभाजीनगर ठरणार शिवसेनेचा एक्झिट प्लान! भाजपची दारं उघडी होणार?

औरंगाबादचं संभाजीनगर ठरणार शिवसेनेचा एक्झिट प्लान! भाजपची दारं उघडी होणार?

महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) भूकंप झालेला असतानाच शिवसेनेने (Shivsena) नवा डाव टाकला आहे. औरंगाबाद (Aurangabad) शहराचं नाव बदलून संभाजीनगर (Sambhaji Nagar) ठेवण्याचा प्रस्ताव उद्या राज्य मंत्री मंडळात मांडणार असल्याचं परीवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी सांगितलं आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 28 जून : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) भूकंप झालेला असतानाच शिवसेनेने (Shivsena) नवा डाव टाकला आहे. औरंगाबाद (Aurangabad) शहराचं नाव बदलून संभाजीनगर (Sambhaji Nagar)  ठेवण्याचा प्रस्ताव उद्या राज्य मंत्री मंडळात मांडणार असल्याचं परीवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी सांगितलं आहे. खरंतर महाविकासआघाडी सरकार आल्यापासूनच भाजपने औरंगाबादचं संभाजीनगर कधी करणार? असा प्रश्न वारंवार उपस्थित करून शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता, पण सत्तेत असलेल्या काँग्रेसने (Congress) या नामांतराला विरोध केला होता. शिवसेनेने आता उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव येणार असल्याचं सांगितल्यामुळे काँग्रेस काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागलं आहे. तसंच औरंगाबादचं संभाजीनगर करणं हा शिवसेनेचा महाविकासआघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा एक्झिट प्लान असणार का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या गटाने हिंदूत्ववादी भूमिका आणि राष्ट्रवादी काँग्रेस निधी वाटपात करत असलेल्या भेदभावाचा आरोप केला आहे. आता शिवसेना औरंगाबादचं संभाजीनगर करून शिंदे गटाची हवाच काढून घेणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर केल्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपच्या युतीचा मार्ग मोकळा होणार का? हादेखील प्रश्न आहे. मुख्यमंत्री-फडणवीसांमध्ये चर्चा? शिवसेनेचे 39 आणि काही अपक्ष असे जवळपास 50 आमदार घेऊन एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये गेले आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या या बंडामुळे महाविकासआघाडी सरकार कोसळण्याची भीती आहे. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात दोन वेळा फोनवर चर्चा झाल्याचं वृत्तही प्रसिद्ध झालं होतं. 21 आणि 22 जूनला उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना फोन केल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवसेनेने मात्र अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Shivsena, Uddhav thackeray

    पुढील बातम्या