Home /News /maharashtra /

BREAKING : अनिल देशमुख-नवाब मलिकांना मतदानाची परवानगी, पण...

BREAKING : अनिल देशमुख-नवाब मलिकांना मतदानाची परवानगी, पण...

सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निकालात महाविकासआघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा धक्का बसला आहे. सरकारला उद्याच बहुमत चाचणीला सामोरं जावं लागणार आहे. तब्बल साडेतीन तास चालेल्या युक्तीवादानंतर कोर्टाने हा निर्णय दिला आहे. असं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) दिलासा मिळाला आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 29 जून : सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निकालात महाविकासआघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा धक्का बसला आहे. सरकारला उद्याच बहुमत चाचणीला सामोरं जावं लागणार आहे. तब्बल साडेतीन तास चालेल्या युक्तीवादानंतर कोर्टाने हा निर्णय दिला आहे. असं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांना फ्लोअर टेस्टमध्ये सहभागी होता येईल, असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे ईडीच्या कस्टडीमध्येच विधानसभेत येतील, तसंच मतदान करून कस्टडीमध्येच परत जातील. 10 जूनला झालेल्या राज्यसभा निवडणूक आणि 20 जूनला झालेल्या विधान परिषद निवडणुकीत नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मत देता आलं नव्हतं. सुप्रीम कोर्टाने उद्या बहुमत चाचणी होणारच, असा निकाल दिला आहे. घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला असताना सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. ही एक ऐतिहासिक सुनावली मानली जात होती. अखेर सुप्रीम कोर्टाने राज्यपालांच्या निर्णयाला योग्य ठरवत बहुमत चाचणीला स्थगिती देता येणार नाही, असा निकाल दिला. त्यामुळे महाविकास आघाडीला हा सर्वात मोठा झटका आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या