मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महाराष्ट्रात सत्तानाट्याचा थरार! पण अमृता फडणवीसांनी का डिलीट केलं ते Tweet?

महाराष्ट्रात सत्तानाट्याचा थरार! पण अमृता फडणवीसांनी का डिलीट केलं ते Tweet?

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचं महाविकासआघाडी सरकार अडचणीत सापडलं आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 21 जून : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचं महाविकासआघाडी सरकार अडचणीत सापडलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 32 आमदार आहेत, तर उद्या 4 अपक्ष आमदार सूरतला रवाना होणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्रामध्ये एकीकडे सत्तानाट्य सुरू असताना माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक ट्वीट केलं. एक 'था' कपटी राजा..... असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं, पण यानंतर अवघ्या काही वेळातच त्यांनी हे ट्वीट डिलीट केलं. अमृता फडणवीस यांनी हे ट्वीट नेमकं का डिलीट केलं, याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

एकीकडे शिवसेनेमध्ये उभी फूट पडलेली असतानाच देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये गेले होते. फडणवीस दिल्ली दौऱ्यावर का गेले, याचं कारण मात्र गुलदस्त्यातच आहे.

विधानपरिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आले, पण त्यांची मतं मोठ्या प्रमाणावर फुटली. शिवसेना आणि त्यांचे सहकारी असे मिळून 64 आमदार असतानाही शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना 26-26 मतं मिळाली, म्हणजेच 12 मतं ही फुटली. या धक्क्याला 24 तास उलटत नाहीत तोच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सूरतला रवाना झाले.

First published:

Tags: Amruta fadnavis, Eknath Shinde, Shivsena, Uddhav thackeray