Home /News /maharashtra /

एवढे आमदार सोडून गेले 16 च आमदारांवर कारवाई का? संजय राऊतांनी दिलं उत्तर

एवढे आमदार सोडून गेले 16 च आमदारांवर कारवाई का? संजय राऊतांनी दिलं उत्तर

शिवसेनेतील उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे (Uddhav Thackeray vs Eknath Shinde) या गटामधील लढाई आता सर्वोच्च न्यायालयात पोहचली आहे. शिवसेनेनं शिंदे गटाच्या 16 आमदारांना नोटीस दिली आहे.

    मुंबई, 27 जून : शिवसेनेतील उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे (Uddhav Thackeray vs Eknath Shinde) या गटामधील लढाई आता सर्वोच्च न्यायालयात पोहचली आहे. शिवसेनेनं शिंदे गटाच्या 16 आमदारांना नोटीस दिली आहे.या आमदारांनी 48 तासात नोटीशीला उत्तर दिलं नाही, तर त्यांना अपात्र ठरवलं जाईल असं शिवसेनेकडून स्पष्ट केलंय. या नोटीशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं असून त्याची सुनावणी आज (सोमवार) होणार आहे. शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील हरीश साळवे आज सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार आहेत. त्याचवेळी शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करणार आहेत. महाराष्ट्र सरकारच्या वतीने देवदत्त कामत लढणार आहेत तर उपाध्यक्षांसाठी अधिवक्ता रविशंकर जंध्याला लढणार आहेत. कोणत्या आमदारांना नोटीस? सध्या गुवाहाटीमध्ये असलेल्या आमदारांपैकी एकनाथ शिंदे, तानाजी सावंत,प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर,लता सोनावणे, यामिनी जाधव, संजय शिरसाट, भरत गोगावले, संदिपान भुमरे ,अब्दुल सत्तार, महेश शिंदे , चिमणआबा पाटील, संजय रायमूलकर, बालाजी कल्याणकर, रमेश बोरणारे या आमदारांना शिवसेनेनं नोटीस दिली आहे. गुवाहाटीमध्ये शिंदे गटाकडं सध्या 39 आमदार आहेत. त्यानंतरही यापैकी फक्त 16 आमदारांनाच नोटीस का? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याला प्रश्नाला शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्तर दिलं आहे. 'आमदारांना नोटीस देण्याची प्रक्रिया कायदेशीर आहे. याबातचा निर्णय शिवसेनेतील विशेष समिती घेते, त्यानुसार या आमदारांना नोटीस देण्यात आली आहे,' असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी हे उत्तर दिलंय. शिंदे गटामध्ये इनकमिंग सुरू, आणखी 2 शिवसेना आमदार गळाला! काय आहे याचिका? सोमवारी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जेबी परडीवाला यांच्या खंडपीठासमोर दोन्ही याचिकांवर सुनावणी होणार आहे. सुनावणीत 7 पक्षकार सहभागी होणार आहेत. यामध्ये विधानसभा उपाध्यक्ष, राज्य विधानसभेचे सचिव, महाराष्ट्र सरकार, अजय चौधरी (उद्धव ठाकरे यांच्या वतीने विधिमंडळ पक्षाचे नवे नेते), सुनील प्रभू (उद्धव सरकारचे नवीन मुख्य व्हिप), भारत संघ, डीजीपी महाराष्ट्र यांचा समावेश आहे. बंडखोर आमदारांनी याचिकेत म्हटले आहे की, शिवसेना विधीमंडळ पक्षाचे २ तृतीयांशहून अधिक सदस्य आम्हाला पाठिंबा देतात. हे कळल्यानंतरही उपाध्यक्षांनी 21 जून रोजी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या नव्या नेत्याची नियुक्ती केली. नोटीसनंतर त्यांना आणि त्यांच्या इतर साथीदारांना दररोज धमक्या येत आहेत. त्यांचा जीव धोक्यात आहे. दुसऱ्या बाजूने (शिवसेनेने) त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा तर काढून घेतलीच, पण पक्षाच्या कार्यकर्त्यांना पुन्हा पुन्हा भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचिकाकर्त्याच्या काही सहकाऱ्यांच्या मालमत्तेचेही नुकसान झाल्याचे याचिकेत म्हटले आहे. त्यांनी शिवसेनेचे सदस्यत्व सोडलेले नाही, असे आमदारांच्या याचिकेत म्हटले आहे.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Eknath Shinde, Sanjay raut, Shivsena

    पुढील बातम्या