Home /News /maharashtra /

पिक्चर अभी बाकी है! विनायक राऊतांचा मोठा दावा; शिंदेंकडचे 18 आमदार आमचेच

पिक्चर अभी बाकी है! विनायक राऊतांचा मोठा दावा; शिंदेंकडचे 18 आमदार आमचेच

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गुरूवारी गुवाहाटीमध्ये शक्तिप्रदर्शन केलं. त्याचवेळी एकनाथ शिंदेसोबत असलेले 18 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेनं केला आहे.

    मुंबई, 23 जून : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गुरूवारी गुवाहाटीमध्ये शक्तिप्रदर्शन केलं. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांचे सरकारी निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदरांची बैठक झाली. या बैठकीला 15 आमदार उपस्थित होते. त्याचवेळी एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या 18 आमदारांचा आमच्याशी संपर्क झाल्याचा दावा शिवसेना नेते विनायक राऊत यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेनेतील सत्तासंघर्ष आणखी चिघळला आहे. यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी 42 आमदारांसह गुवाहाटीमध्ये शक्तिप्रदर्शन केले. त्यानंतर लगेच राऊत यांनी हा दावा केल्यानं शिवसेनेतील कोणत्या गटाकडे सर्वाधिक आमदार आहेत? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये त्यांनी 42 आमदारांसोबत शक्तिप्रदर्शन केले आहे. शिंदे यांच्यासोबत किती आमदार आहेत? हा प्रश्न विचारला जात होता. शिंदे 50 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र संध्याकाळपर्यंत राज्यपालांना देतील, असे मानले जात होते. त्यावेळी शिंदे यांनी हे शक्तीप्रदर्शन करत आपल्यासोबत सेनेचे बहुसंख्य आमदार असल्याचं दाखवून दिलं आहे. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी १४४ हा स्पष्ट बहुमताचा आकडा आहे...शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे समर्थक ५० आमदार आणि भाजपचे समर्थक ११४ आमदार असे मिळुन १६४ आमदारांचे बहुमत विधान सभेत सिद्ध करून राज्यात भाजप+शिवसेना ( शिंदे गट ) असे सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. गुवाहाटीतून सगळ्या आमदारांचा पहिलाच VIDEO, एकनाथ शिंदेंचं जोरदार शक्तिप्रदर्शन शरद पवार मैदानात सरकार वाचवण्यासाठी आता महाविकासआघाडीचे जनक शरद पवार मैदानात उतरले आहेत. एकनाथ शिंदे आणि सोबत असलेल्या आमदारांना सर्वात आधी महाराष्ट्रात येऊ द्या ,असंतोष तयार करून आमदार वळवता येतात का ते तपासा आणि तोपर्यंत तांत्रिक मुद्द्यांवर पेच वाढवत न्या, असा सल्ला शरद पवारांनी दिला आहे. त्यामुळे एका बाजूला एकनाथ शिंदे आणि भाजप विरद्ध उद्धव ठाकरे आणि शरद पवार असा सामना आगामी काळात रंगणार आहे.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena

    पुढील बातम्या