Home /News /maharashtra /

Propose करण्यासाठी ‘बॅटमॅन’ने पोलिसांकडे मागितली मदत, महाराष्ट्र पोलिसांचं मजेशीर उत्तर

Propose करण्यासाठी ‘बॅटमॅन’ने पोलिसांकडे मागितली मदत, महाराष्ट्र पोलिसांचं मजेशीर उत्तर

आपल्या ट्विटमधून जागरुकता परसवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र पोलिसांकडून करण्यात येतो. महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या अशाच एका ट्विटवर एक मजेशीर कमेंट आली आणि त्याला महाराष्ट्र पोलिसांनी दिलेलं उत्तर आणखी मजेशीर आहे.

    मुंबई,8 फेब्रुवारी : महाराष्ट्र पोलिसांकडून दक्षतेसाठी विविध ट्वीट करण्यात येतात. अनेकदा माहिती देण्यासाठी तर अनेकदा विविध सूचना देण्यासाठी काही ट्वीट करण्यात येतात. आपल्या ट्वीटमधून जागरुकता परसवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र पोलिसांकडून करण्यात येतो. महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या अशाच एका ट्वीटवर एक मजेशीर कमेंट आली आणि त्याला महाराष्ट्र पोलिसांनी दिलेलं उत्तर आणखी मजेशीर आहे. सध्या Valentine Week सुरू आहे. रोज नवा दिवस प्रेमीयुगुलांकडून विविध प्रकारे साजरा करण्यात येतो. आज Propose Day आहे. याचाच आधार घेत महाराष्ट्र पोलिसांनी एक ट्वीट केलं आहे. ‘Propose Day ला आयुष्याचा भागीदार शोधा, गुन्हेगारीतला नाही’ असं ट्वीट महाराष्ट्र पोलिसांनी केलं आहे. यामध्ये त्यांनी #ChooseWisely आणि #ProposeDay2020 असे हॅशटॅग देखील वापरले आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या या ट्वीटवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेकदा महाराष्ट्र पोलीस या प्रतिक्रियांना रिप्लाय देखील देतात. आजही काहीसं असच झालं आहे. एका मजेशीर प्रतिक्रियेला त्यांच्याकडून एकदम भन्नाट रिप्लाय देण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या ट्वीटला रिप्लाय करताना ट्विटरवर ‘Batman’ असं नाव असणाऱ्या एका युजरने पोलिसांकडेच मदत मागितली आहे. Propose Day च्या ट्वीटवर ‘सर काही रेफरन्स असेल तर द्या’ अशी मागणी या युजरने केली आहे. त्यावर पोलिसांनी दिलेला रिप्लाय आणखी भन्नाट आहे. ‘तुमचा जोडीदार तुम्हीच शोधू शकता, राव! आमच्या ताब्यात तर गुन्हेगारच असतात!’ असा रिप्लाय करत पोलिसांनी सर्वांचीच वाह वा मिळवली आहे. या युजरने पोलिसांची मदत मागताना 'Thank You in advanve' असं म्हणत आभार देखील मागितले होते. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र पोलिसांनी या 'बॅटमॅन' रिप्लाय देत 'Sorry in advance' असं देखील ट्वीट केलं आहे. मुंबई पोलिसांच्या या सगळ्याच भन्नाट ट्वीटवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Batman, Facebook, Maharashtra police, Mumbai police, Twitter War

    पुढील बातम्या