महिलांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र पोलिसांचे एक पाऊल पुढे

महिलांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र पोलिसांचे एक पाऊल पुढे

बुलडाणा जिल्हा पोलीस दलाने एक पाऊल पुढे नेत महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात 'कळी उमलताना' या प्रकल्पाची बुलडाणा जिल्ह्यातून सुरुवात करण्यात आली.

  • Share this:

अमोल गावंडे, प्रतिनिधी

बुलढाणा, 14 डिसेंबर : देशात महिला आणि मुलींसोबत दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमुळे संपूर्ण देश सतर्क झाला आहे. यामध्ये बुलडाणा जिल्हा पोलीस दलाने एक पाऊल पुढे नेत महिला व  विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात 'कळी उमलताना' या प्रकल्पाची बुलडाणा जिल्ह्यातून सुरुवात करण्यात आली. यामध्ये शनिवारी सकाळी खामगाव येथील जिल्हा परिषद कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले. जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी कळी उमलताना या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे.

यामध्ये शनिवारी खामगाव शहरात स्वराज्य फाऊंडेशन खामगाव, पोलीस प्रशासन खामगाव व बुलडाणा जिल्हा जेनसुरयो कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी, मुलींसाठी व विद्यार्थिनींसाठी मोफत कराटे शिबीर आयोजित करण्यात आलं तर या शिबिराचे उद्घाटन सकाळी 8 वा जिल्हा परिषद कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रोड येथे पार पडले.

इतर बातम्या - नको असलेली गर्भधारणा थांबवण्यासाठी कोणते गर्भनिरोधक आहे सगळ्यात बेस्ट?

या उद्घाटन कार्यक्रमाला कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी बुलडाणा जिल्हाधिकारी श्रीमती सुमन चंद्रा, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ हे प्रमुख मार्गदर्शक होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून अप्पर पोलिस अधीक्षक हेमाराजसिंह राजपूत, माजी तहसीलदार शितलकुमार रसाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, विभागीय पोलीस अधिकारी मलकापूर प्रिया ढाकणे, बुलडाणा महिला सेलच्या प्रमुख निकाळजे, जि.प.कन्या शाळेच्या प्राचार्य अनुराधा भावसार शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर, शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र देशमुख, ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार रफिक शेख आणि स्वराज्य फाऊंडेशनचे अमोल गावंडे यांची उपस्थिती होती.

इतर बातम्या - हैदराबाद प्रकरणी नराधमांनी पार केली भोगविलासाची सीमा, फॉरेन्सिक रिपोर्टचा खुलासा

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी चंद्रा म्हणाल्या की, मुलींनी घाबरून जाण्याचे आवश्यकता नाही. जिल्हा प्रशासन त्यांच्या सोबत आहे. माझे कार्यालय नेहमीच त्यांच्यासाठी खुले आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हेल्पलाईन नंबर महिलांसाठी 1091 किंवा मोबाईल क्रमांक 8698000011 या क्रमांकाचे अनावरण करण्यात आले.

जिल्हा पोलिस अधिकांऱ्यांनी मार्गदर्शन करतांना महिला आणि मुलींसाठी पोलीस प्रशासनाने केलेल्या विवध सुविधांची माहिती देत सांगितले की, मुलींच्या व महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने तक्रार पेट्या किंवा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित करण्यात आले आहे. महिला व मुलींनी त्या सेवेचा लाभ घ्यावा असे आव्हान यावेळी त्यांनीं केले आहे.

इतर बातम्या - ...नाहीतर हैदराबादसारखी अवस्था होईल, मुंबईतील डॉक्टर महिलेला 2 तरुणांची धमकी

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता स्वराज्य फाऊंडेशनचे सदस्य कुणाल देशपांडे, प्रवीण ठाकरे, शिवाजी भोसले, नितीन सुर्वे, निखिल शहा, रविराज सुरडकर, रवी वानखेडे, साक्षी गोळे पाटील, तेजल पाटील, पूजा कोरडे, जेनसुरयो कराटे असोसिएशनचे प्रशिक्षक सूरज खंडेराव यांची संपूर्ण टिम व यांच्यासह समस्त स्वराज्य फाऊंडेशन, खामगाव पोलीस विभाग आणि बुलडाणा जेनसुरयो कराटे असोसिएशन आदींनी परिश्रम घेतले.

मोठी बातमी - राजकारणात पुन्हा खळबळ, शिवसेनेला भाजपची आणखी एक ऑफर

Published by: Renuka Dhaybar
First published: December 14, 2019, 3:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading