Home /News /maharashtra /

महिलांची छेड काढणाऱ्याला पोलिसांनी चांगलाच धुतला, महिला पोलिसांच्या कारवाईचा VIDEO VIRAL

महिलांची छेड काढणाऱ्याला पोलिसांनी चांगलाच धुतला, महिला पोलिसांच्या कारवाईचा VIDEO VIRAL

झुकेगा नही, म्हणणाऱ्या भाईला पोलिसांनी भर रस्त्यात चांगलाच झुकवला, महाराष्ट्र पोलिसांच्या कारवाईचा VIDEO VIRAL

झुकेगा नही, म्हणणाऱ्या भाईला पोलिसांनी भर रस्त्यात चांगलाच झुकवला, महाराष्ट्र पोलिसांच्या कारवाईचा VIDEO VIRAL

Maharashtra Police in action mode: महिलांची छेड काढणाऱ्या एका रोड रोमिओला पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला आहे. या गुंडाची पोलिसांनी वरात काढून चांगलाच चोप दिला आहे.

    नितीनकुमार प्रतिनिधी लातूर, 17 मार्च : महिलांची छेड काढणाऱ्या एका रोड रोमिओला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली (Road Romeo beaten by police) आहे. या रोड रोमिओला पकडून पोलिसांनी त्याची भर रस्त्यात वरात काढली आणि त्यानंतर चांगलाच चोपही दिला. लातूर पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. (Latur Police beat a road romeo on road, video goes viral) लातुरात महिला पोलिसांचा रुद्र अवतार पहावयास मिळाला आहे. खुले आम मुली-महिलांची छेड काढणाऱ्या गुन्हेगारास,लातूर पोलीस दलातील महिला पोलिसांनी चांगलाच पोलीसी इंगा दाखवत रसत्यावरुन वरात काढली. महिला पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे रोडरोमिओंमध्ये एकच खळबळ उडाली आहे. लातूर विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी छेडछाड करणाऱ्या गुन्हेगारांना खाकी झटका दाखवला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे मोबाइल शूट सध्या जोरदार व्हायरल होत आहेत. लातुरातील विवेकानंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या या भागात महिलांची व मुलींची छेड काढणाऱ्या एका रोड रोमिओला पोलिसांनी वरात काढून चोप दिला आहे. तसेच अश्या प्रवृत्तींच्या लोकांना कोणीही पाठबळ न देण्याचे आवाहन देखील पोलिसांनी केलं आहे. वाचा : मुंबईत तुंबळ हाणामारी, कॉलेजच्या गेटवर 12वीच्या विद्यार्थ्याला मारहाण,LIVE VIDEO या रोड रोमिओचं नाव गौस मुस्तफा असे आहे. त्याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. तो एक सराईत गुन्हेगार आहे. काही दिवसांपूर्वी त्याने एका मुलीची छेड काढली तसेच तिला मारहाणही केली. अशा प्रकारचे कृत्य करुन त्याने परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची माहिती पोलिसांन मिळताच पोलिसांनी मुस्तफा याला आपला खाकी इंगा दाखवला. वाचा : प्रेयसीसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत असताना तरुणाचा मृत्यू; GFने केला धक्कादायक खुलासा गौस मुस्तफा हा दयादेश्वर नगर परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी तेथे दाखल होत त्याच्या मुसक्या आवळल्या. यानंतर पोलिसांनी त्याला पकडून त्याची संपूर्ण परिसरात वरात काढली. यावेळी पोलिसांनी त्याला भररस्त्यात चोपही दिला. पतीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, महिलेचं भयानक कृत्य ठाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिलेने आपल्या पतीसोबत प्रेमसंबंधांच्या संशयातून दुसऱ्या महिलेवर उकळते तूप टाकले. त्यामुळे पीडित महिला प्रचंड भाजली होती. पीडित महिलेने हल्ल्याच्या घटनेनंतर सलग दोन महिने मृत्यूशी झुंज दिली. पण तिचा हा संघर्ष अपयशी ठरला. पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे महिलेचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा सगळा भयानक प्रकार समोर आला. या घटनेमुळे संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Crime, Latur

    पुढील बातम्या