एसटी बसमध्ये सापडला IED बॉम्ब, नागरिकांमध्ये खळबळ

एसटी बसमध्ये सापडला IED बॉम्ब, नागरिकांमध्ये खळबळ

कर्जत-आपटा एसटीमध्ये रात्री 11 वाजल्यापासून बॉम्ब सदृश्य वस्तू दिसल्याने खळबळ उडाली.

  • Share this:

रायगड, 21 फेब्रुवारी : रायगड जिल्ह्यातील कर्जत-आपटा एसटीमध्ये IED बॉम्ब सापडला आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर बॉम्ब स्क्वॉड पथकाने घटनास्थळी दाखल होत हा बॉम्ब निकामी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

कर्जत-आपटा एसटीमध्ये रात्री 11 वाजल्यापासून बॉम्ब सदृश्य वस्तू दिसल्याने खळबळ उडाली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर घटनास्थळी झाले. त्यानंतर रायगड अलिबागहून बॉम्ब स्क्वॉड पथक आपटा इथं रवाना झालं आणि या पथकाकडून बॉम्ब निकामी करण्यात आला.

दरम्यान, जवळजवळ 3 किलो पांढऱ्या रंगाच्या पाऊडर आणि डिटोनेटरपासून हा IED बॉम्ब तयार करण्यात आला होता. हा बॉम्ब फुटला असता तर मोठा स्फोट झाला असता.

एसटी बसमध्ये बॉम्ब आढळल्याने परिसरात भीतीचं वातावरण तयार झालं होतं. आता पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. पेणहून पनवेलकडे येताना आपटा फाट्यावरुन रसायनीकडे जाणा-या रोडवर आपटा गाव आहे.

एकट्या महिलेने लिफ्टमध्ये जाण्याआधी हा VIDEO नक्की पाहा

First published: February 21, 2019, 9:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading