पंढरपूर, 10 फेब्रुवारी : शिवसेना आणि भाजपमधला सत्तासंघर्ष आणि राजकीय वाद राज्याला नवा नाही. या दोन्ही पक्षांमध्ये रोज या ना त्या कारणाने खटके उडतच असतात. बॅनर वॉर, ट्विटर वॉरनंतर आता या दोन्ही पक्षांमध्ये थाळी वॉर सुरू झालं आहे. खरंच थाळी वॉर सुरू झालंय. शिवसेनेने वचननाम्यात शिवभोजन थाळीचं आश्वासन दिलं होतं. शिवसेनेनं काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जात महाविकास आघाडी स्थापन करत सत्ता काबीज केली आणि शिवभोजन थाळी खरोखर अस्तित्वात आली. सत्तेवर आल्यावर महाविकास आघाडी सरकारने राज्यभरातील प्रमुख शहरांमध्ये शिवभोजन थाळी सुरूही केली. त्याला उत्तर देण्यासाठी भाजपने पंढरपूरमध्ये आता दिनदयाळ थाळीची घोषणा केली आहे. पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीचं औचित्य साधून 11 फेब्रुवारीपासून पंढरपूरमध्ये ही थाळी सुरू केली जाणार आहे. भाजपचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
अल्प दरात 10 पदार्थ
पंढरपूरला दररोज हजारो भाविक भेट देत असतात. त्यांना अल्पदरात जेवण मिळावं यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आलाय. दुपारी 12 ते 1 या वेळेत प्रथम येणाऱ्या 51 भाविकांना या दिनदयाळ थाळीचा आस्वाद घेता येणाराय. या दिनदयाळ थाळीत 3 चपात्या, एक भाताची वाटी, एक भाजी वाटी, एक आमटी वाटी, शेंग चटणी, लोणचे, पापड इत्यादी 10 पदार्थ मिळणार आहेत.. विठ्ठल मंदिरापासून 5 मिनिटांच्या अंतरावर इंदिरा गांधी मार्केट जवळ ही हे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या हस्ते 11 फेब्रुवारीला या थाळीचा शुभारंभ होणाराय. त्यामुळे शिवसेनेच्या शिवभोजन थाळीला भाजपची दिनदयाळ थाळी कितपत टक्कर देतेय हे बघावं लागणार आहे.
अन्य बातम्या
'प्रेम की गंगा बहाते चलो', मुस्लीम मुलीच्या लग्नाचं हिंदू कुटुंबाने दिलं आमंत्रण
RSSचे नेते दहशतवाद्यांच्या 'हिट लिस्ट'वर, महाराष्ट्रात होऊ शकतो नवा VBIED हल्ला
शाळेत कॉपी करायला मीच मदत केली होती, उद्धव ठाकरेंनी सांगितला किस्सा VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.