LIVE : शेतकरी संघटनांचे 14 डिसेंबरला देशव्यापी निदर्शने, दिल्लीकडे येणारे महामार्ग रोखणार
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स
Lokmat.news18.com | December 9, 2020, 10:13 PM IST
Last Updated December 9, 2020
auto-refresh
Highlights
9:04 pm (IST)
माजी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांचं निधन, कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास, गेल्या अनेक दिवसांपासून सावरा होते आजारी
8:53 pm (IST)
केंद्रीय गृहमंत्र्यांसोबतची बैठक संपली, सुमारे अडीच तास चालली बैठक; नरेंद्रसिंह तोमर, पियूष गोयलही बैठकीला होते उपस्थित
8:44 pm (IST)
'स्थानिक स्वराज्य निवडणुका एकत्र लढणार'
महाविकास आघाडी एकत्र लढणार -सत्तार
'सेनेची स्टॅटजी लढवण्यासाठी बैठक होती'
'सर्व निवडणुकांसाठी तयारीला लागा'
उद्धव ठाकरेंचे शिवसेना नेत्यांना आदेश
अब्दुल सत्तार यांची बैठकीनंतर माहिती
8:34 pm (IST)
शिवसेना मंत्र्यांची महत्वाची बैठक संपली
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरू होती बैठक
8:30 pm (IST)
मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचं आरोग्यमंत्र्यांचं आवाहन
8:28 pm (IST)
रक्त पुरवठा वाढावा म्हणून मी स्वतः रक्तदान करणार -राजेश टोपे
7:26 pm (IST)
कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन परवानगीला सरकारचा ग्रीन सिग्नल नाही, भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूटनं मागितली होती परवानगी
7:21 pm (IST)
ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले कोरोना पॉझिटिव्ह, लक्षणं जाणवल्यानं केली होती अँटिजेन टेस्ट, संपर्कातील लोकांना टेस्ट करण्याचं आवाहन, डिसलेंच्या कुटुंबीयांची टेस्ट निगेटिव्ह
7:15 pm (IST)
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून 'शरद पवार ग्रामसमृद्धी योजना' राज्य योजना म्हणून राबवणार, राज्याच्या अपारंपरिक ऊर्जानिर्मिती धोरणास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता, राज्यात स्थापन करण्यात येणाऱ्या 'आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र 2020'च्या विधेयकास मान्यता, 'डी.वाय. पाटील अॅग्रिकल्चर अॅण्ड टेक्निकल युनिव्हर्सिटी, तळसंदे, कोल्हापूर' या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाच्या स्थापनेस मान्यता
7:15 pm (IST)
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय - बँकांशी संबंधित दस्तावरील मुद्रांक शुल्काच्या दरामध्ये एकसमानता आणणार, महाराष्ट्र लोकसेवा
आयोगाचा 2018-19 चा वार्षिक अहवाल विधानमंडळाच्या पटलावर ठेवण्याबाबत मान्यता, महिला व बाल अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी तयार केलेल्या विधेयकांचा मसुदा विधिमंडळात सादर करण्यास मान्यता