• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • LIVE : मराठा आरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड, सुप्रीम कोर्टात उद्या होणार सुनावणी

LIVE : मराठा आरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड, सुप्रीम कोर्टात उद्या होणार सुनावणी

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | December 08, 2020, 18:14 IST
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  22:10 (IST)

  औरंगाबाद - पर्यटनस्थळं उद्यापासून खुली करणार, टूरिस्ट गाईड व पर्यटकांनी नियमांचं पालन करावं, केवळ ऑनलाईन तिकीट नोंदणी करता येणार  , पर्यटकांना मर्यादित प्रवेश, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं आवश्यक -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

  20:47 (IST)

  माऊंट एव्हरेस्टची नवी उंची नेपाळकडून जाहीर
  जगातील सर्वात उंच शिखर अशी ओळख
  माऊंट एव्हरेस्टची नवी उंची ही 8848.86 मीटर
  नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीपकुमार ग्यावलींची माहिती

  20:33 (IST)

  महिला आणि बाल अत्याचाराबाबत कडक कायदा
  दिशा कायद्याला उद्या मंत्रिमंडळात मंजुरी मिळण्याची शक्यता
  गेले अनेक दिवस 'दिशा' लागू करण्याबाबत सुरू होती कारवाई
  सरकार स्थापन झाल्यानंतरच्या अधिवेशनात दिशा कायदा लागू करण्याची केलेली घोषणा

  20:27 (IST)

  राज्यात 6 हजार शिक्षक भरतीला मान्यता
  राज्यात लवकरच पदभरती होणार
  पवित्र पोर्टल पद्धतीनं शिक्षक भरती
  गेल्या 2 वर्षांपासून थांबली होती भरती

  20:16 (IST)

  नागपूर मनपाच्या 11,537 अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू, पालकमंत्री नितीन राऊत यांच्या प्रयत्नांना अखेर यश

  19:42 (IST)

  पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी 
  जागतिक स्तरावरील सल्लागार नियुक्त करा -मुख्यमंत्री
  पर्यटकांना आकर्षित करणार, परिसराचा देखील विकास करणार -उद्धव ठाकरे

  18:50 (IST)

  साराभाई इमारत सिलेंडर स्फोट प्रकरण
  मुंबईच्या लालबाग परिसरातील घटना
  'मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रु.'
  'जखमींना 50 हजारांची आर्थिक मदत'
  'मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देणार मदत'
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं जाहीर

  18:33 (IST)

  विनायक मेटेंचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र
  पत्रात मेंटेनी काही मुद्दे उपस्थित केले
  शैक्षणिक स्थगिती, प्रवेश, नोकरभरती
  या मुद्यांवर लक्ष देण्याची पत्रात मागणी

  18:10 (IST)

  मराठा आरक्षण प्रकरण 
  उद्या बुधवार 9  डिसेंबर, 2020 रोजी दुपारी 2 वाजता मराठा आरक्षणावरील सुनावणी पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर होणार आहे. या बेंचमध्ये न्यायमूर्ती अशोक भूषण, नागेश्वर राव, हेमंत गुप्ता, रवींद्र भट आणि अब्दुल नजीर हे न्यायमूर्ती असतील. 
  या सुनावणीत अ‍ॅड. संदीप देशमुख आणि ज्येष्ठ विधीतज्ञ अभिषेक सिंघवी हे बाजू मांडणार आहेत.

  17:41 (IST)

  नवी मुंबई महापालिका आयुक्तांचा आरोग्य विभागाला दणका
  , अचानक वाशीतील मनपा रुग्णालयाला भेट, गैरहजर असलेल्या 8 डॉक्टरांना बजावली नोटीस, अभिजीत बांगर यांनी केली कारवाई

  eकोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स