liveLIVE NOW

LIVE : मुंबईजवळच्या शहरात रुग्णालयाला लागली आग

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | December 06, 2020, 22:48 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED A YEAR AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  22:39 (IST)

  उल्हासनगर

  - मॅक्सि लाईफ हॉस्पिटलला आग
   
  - दुसऱ्या मजल्यावर लागली आग

  - शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

  - हॉस्पिटलमधील सर्व रुग्णांना काढले बाहेर

  - दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी नाही

  - अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

  22:5 (IST)

  औरंगाबाद - घाटी रुग्णालयातील प्रकार, कोरोना रुग्णाकडून रुग्णालयाच्या दरवाजाची तोडफोड, रुग्ण घरी जाण्यासाठी करत होता तगादा

  21:57 (IST)

  लालबागच्या गणेशगल्ली परिसरातील घटना
  साराभाई इमारत दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू
  44 वर्षांची महिला झाली होती गंभीर जखमी
  सिलेंडरच्या स्फोटात जास्त भाजली होती
  मसिना रुग्णालयात सुरू होते उपचार

  21:32 (IST)

  सेनेचा शेतकऱ्यांच्या देशव्यापी बंदला पाठिंबा
  शिवसेना नेते संजय राऊत यांची माहिती
  जनतेनं स्वयंस्फूर्तीनं सहभागी व्हावं -शिवसेना

  20:46 (IST)

  8 डिसेंबरच्या 'भारत बंद'ला 'आप'चा पाठिंबा
  अरविंद केजरीवाल यांनी केलं ट्विट
  नागरिकांना शेतकऱ्यांना समर्थन देण्याचं आवाहन

  20:31 (IST)

  बार्टीच्या धरतीवर आर्टी सुरू करा, धनगर समाज आणि भटक्या विमुक्त जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्या -आमदार गोपीचंद पडळकर

  19:57 (IST)

  राज्यात दिवसभरात 4,757 नवे रुग्ण
  राज्यात दिवसभरात 7,486 रुग्ण बरे
  राज्यात दिवसभरात 40 रुग्णांचा मृत्यू
  रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 93.04 टक्के
  राज्यात सध्या 80,079 अॅक्टिव्ह रुग्ण

  19:44 (IST)

  पंढरपूर - भरधाव टेम्पोनं पोलिसाला चिरडलं
  टेंभुर्णीजवळील वरवडे टोलनाका इथली घटना
  तपासणीसाठी टेम्पोला थांबवण्याचा केला होता प्रयत्न
  चालकानं पोलिसाच्या अंगावर घातला टेम्पो
  वाहतूक नियंत्रण पोलिसाचा जागीच मृत्यू

  18:17 (IST)
  डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र हे जागतिक स्तरावर व्हावं यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे, 6 एकर जागेवर संशोधन केंद्र उभारणार आहे, या केंद्राच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी संलग्न वाढवण्यात यशस्वी करण्याचा प्रयत्न होणार -उदय सामंत
   
  17:49 (IST)

  मुंबई विद्यापीठातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 
  कोनशिला अनावरण समारंभ

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स