liveLIVE NOW

LIVE : भारत बायोटेकची Corona लस पुढच्या टप्प्यात; चाचणीला परवानगी

कोरोनाचे वाढते रुग्ण ते राज्यासह देशातील महत्त्वाच्या बातम्या. दिवसभरातील सर्व महत्त्वाचे अपडेट

 • News18 Lokmat
 • | September 04, 2020, 20:10 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED A YEAR AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  22:22 (IST)
  राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) आणि नेव्हल अॅकॅडमी (एनए) परीक्षेत भाग घेणाऱ्या उमेदवारांसाठी 4, 5 आणि 6 सप्टेंबर 2020 रोजी मध्य रेल्वे विशेष गाड्या चालवणार
   
  22:5 (IST)

  राज्यातील अनेक जिल्हा रुग्णालयांत डॉक्टर आणि नर्सेसची कमतरता, मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं
  राज्यातल्या जिल्हा रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सेसच्या भरतीबाबत हायकोर्टानं दाखवली तीव्र नाराजी, तात्पुरत्या किंवा कंत्राटी पद्धतीनं डॉक्टर भरतीला प्रतिसाद नाही, हायकोर्टाचं निरीक्षण
  कायमस्वरूपी मेडिकल आणि पॅरा मेडिकल स्टाफ भरण्याबाबत राज्य सरकार उदासीन, 10 सप्टेंबरपर्यंत राज्यातल्या जिल्हा रुग्णालयांमध्ये डॉक्टर आणि नर्सेस भरतीबाबत शपथपत्र करण्याचे हायकोर्टाचे राज्य शासनाला आदेश, रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाबाबत दाखल झालेल्या याचिकेवर आदेश

  22:4 (IST)

  राज्यातील अनेक जिल्हा रुग्णालयांत डॉक्टर आणि नर्सेसची कमतरता, मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं
  राज्यातल्या जिल्हा रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सेसच्या भरतीबाबत हायकोर्टानं दाखवली तीव्र नाराजी, तात्पुरत्या किंवा कंत्राटी पद्धतीनं डॉक्टर भरतीला प्रतिसाद नाही, हायकोर्टाचं निरीक्षण
  कायमस्वरूपी मेडिकल आणि पॅरा मेडिकल स्टाफ भरण्याबाबत राज्य सरकार उदासीन, 10 सप्टेंबरपर्यंत राज्यातल्या जिल्हा रुग्णालयांमध्ये डॉक्टर आणि नर्सेस भरतीबाबत शपथपत्र करण्याचे हायकोर्टाचे राज्य शासनाला आदेश, रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाबाबत दाखल झालेल्या याचिकेवर आदेश

  21:22 (IST)

  राज्यात रोज हजारानं वाढतेय कोरोना रुग्णसंख्या
  राज्यात दिवसभरात आज कोरोनाचे 19 हजार 218 रुग्ण
  राज्यात दिवसभरात कोरोनामुळे 378 जणांचा मृत्यू
  राज्यात आज 13 हजार 289 रुग्ण बरे होऊन घरी

  20:40 (IST)

  सुशांतसिंह ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी सर्वात मोठी बातमी
  एनसीबीकडून शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडाला अटक
  उद्या शौविकला न्यायालयात हजर करणार

  20:25 (IST)

  'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम राज्यभर राबवणार
  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची नवी मोहीम
  आरोग्य पथक घरोघरी जाऊन तपासणी करणार

  20:20 (IST)

  उपराजधानी नागपूरवरील कोरोनाचं संकट आणखी गडद
  नागपूर जिल्ह्यात आज 1966 कोरोना रुग्णांची नोंद
  नागपूर जिल्ह्यात आज कोरोनामुळे 39 रुग्णांचा मृत्यू
  नागपुरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 36 हजार 398 वर

  20:12 (IST)

  भारत बायोटेकची कोरोना लस पुढच्या टप्प्यात

  भारत बायोटेक तयार करत असलेल्या COVID Vaccien च्या दुसऱ्या टप्प्यातल्या चाचणीसाठी परवानगी मिळाली आहे. 

  सोमवारी सुरू होणार फेज 2 ट्रायल्स

  19:52 (IST)

  कोरोनाचा लढा किती दिवस चालणार हे सांगणं कठीण, 

  आकडा शून्यावर कधी येईल हे सांगणं कठीण आहे, 

  मेडिकलचे चार स्तंभ आपल्याला मजबूत करायचेत; 

  टेस्ट करणं, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणं, क्वारंटाईन करणं आणि ट्रीटमेंट करणं हे महत्वाचं आहे, 

  मुंबईत आम्ही सर्व्हेलन्स केलं, घरी जाऊन लोकांच्या चाचण्या केल्या, 

  या पद्धतीनं काम सुरू आहे -इक्बाल चहल

  तेच सगळं नागपुरात करण्याची गरज आहे, 

  प्रत्येक शहरात वेगवेगळी कारणं आहेत, रुग्णाला लगेच रिपोर्ट मिळाला पाहिजे आणि त्याच्यावर ट्रीटमेंट सुरू झाली पाहिजे, 

  उशिरा रिपोर्ट मिळाले तर ट्रीटमेंट उशिरा होते आणि त्यामुळे मृत्यू वाढतो, 

  सुरुवातीला 

  मुंबईतसुद्धा मृत्युदर जास्त होता, तो आता कमी झाला, 

  बेड उपलब्ध करून देण्यासाठी उपाय करणं, रुग्णाला बेड मिळणं 

  आवश्यक आहे, 

  टेस्टिंग वाढल्या तर रुग्ण वाढतील -इक्बाल चहल

  19:2 (IST)

  विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंना कोरोनाची लागण
  खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल होणार
  ऐन अधिवेशनाच्या तोंडावर विधानसभा अध्यक्षांना लागण
  काही प्राथमिक लक्षणं दिसत असल्यानं केली चाचणी

  मुंबई, 04 सप्टेंबर : कोरोनाचे वाढते रुग्ण ते राज्यासह देशातील महत्त्वाच्या बातम्या. दिवसभरातील सर्व महत्त्वाचे अपडेट वाचा एका क्लिकवर