• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • LIVE : विधानपरिषद निवडणुकीत वातावरण पेटलं, सुप्रिया सुळेंच्या आवाजाची नक्कल केल्याने राष्ट्रवादी आक्रमक

LIVE : विधानपरिषद निवडणुकीत वातावरण पेटलं, सुप्रिया सुळेंच्या आवाजाची नक्कल केल्याने राष्ट्रवादी आक्रमक

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | November 30, 2020, 00:11 IST
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  0:9 (IST)

  औरंगाबाद पदवीधर निवडणूक
  - सुप्रिया सुळे यांच्या आवाजाची नक्कल 
  -भाजपला मतदान करा अशी ऑडिओ क्लिप फिरवण्यात येत असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
  - निवडणूक आयोगाला करणार तक्रार 
  - सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान करण्याबाबत आवाहन करणारी केली होती ऑडिओ क्लिप
  - या ऑडिओ क्लिपमध्ये छेडछाड करून भाजपला मतदान करा, असा बदल करण्यात आला

  20:32 (IST)

  मुंबई - विनामास्क नागरिकांना 200 रुपये दंड केल्यानंतर आता देणार मोफत मास्क, विनामास्क वावरणार्‍या 4 लाख 85 हजार   नागरिकांकडून आतापर्यंत 10 कोटी 7 लाखांचा दंड वसूल

  20:28 (IST)

  बीड - आष्टीच्या पारगाव बोराडेची घटना
  45 वर्षांच्या महिलेवर बिबट्याचा हल्ला
  बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा बळी
  बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत 3 बळी
  नरभक्षक बिबट्याचा पथकांकडून शोध

  20:9 (IST)

  छत्तीसगड - दंतेवाड्याच्या सुरनारजवळची घटना
  माओवाद्यांचा डाव सतर्कतेमुळे उधळला
  आयडी बॉम्ब रस्त्यात ठेवला होता पेरून
  जवानांची आज होणार होती मुव्हमेंट
  टिफीनमधील बॉम्ब निष्क्रिय केला
  बॉम्बशोधक पथकाची कामगिरी
  पोलिसांच्या बॉम्बशोधक पथकाला यश

  19:59 (IST)

  पुणे - नवले पुलाजवळ भीषण अपघात
  सुमारे 8 गाड्यांची विचित्र धडक
  एका मोठ्या कंटेनरनं घेतला पेट
  अग्निशमनच्या जवानांनी आग विझवली
  अपघातात एकाचा मृत्यू, 6 जण गंभीर

  19:46 (IST)

  गृहमंत्री अनिल देशमुखांचा परिवारासोबत मेट्रो प्रवास, बर्डी ते लोकमान्य नगर केला मेट्रो प्रवास

  19:41 (IST)

  बारामती - माळेगावमधील धक्कादायक घटना
  आईनंच घेतला पोटच्या मुलीचा जीव
  तिसरीही मुलगीच झाली म्हणून केला खून

  19:20 (IST)

  10वी, 12 वीच्या परीक्षा एप्रिल-मेममध्ये?
  '10वी, 12 वीचा अभ्यासक्रम 25% कमी'
  'मुलांवरील ताण कमी करण्याचं लक्ष्य'
  'एप्रिल-मेमध्ये 10वी, 12 वीच्या परीक्षा घेण्याचा विचार'
  शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांची माहिती

  19:5 (IST)

  राज्यात दिवसभरात 5,544 नवे रुग्ण
  राज्यात दिवसभरात 4,362 रुग्ण बरे
  राज्यात दिवसभरात 85 रुग्णांचा मृत्यू
  रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 92.36 टक्के
  राज्यात सध्या 90,997 अॅक्टिव्ह रुग्ण

  18:3 (IST)

  सुप्रीम कोर्टाची इतर बाबतीत स्थगिती नाही पण मराठा आरक्षणाला का दिली असा विचार येतो, सरकार प्रयत्न करतेय हा विषय न्यायालयात प्रमाणिकपणे लवकर सोडवण्याचा -एकनाथ शिंदे

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स