LIVE NOW

LIVE: कृषीमंत्री दादा भुसे यांना कोरोनाची लागण, ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

Lokmat.news18.com | December 29, 2020, 10:15 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated December 29, 2020
auto-refresh

Highlights

10:15 pm (IST)

कृषीमंत्री दादा भुसेंना कोरोनाची लागण, मुंबईच्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल, संपर्कात आलेल्यांनी तपासणी करून घेण्याचं केलं आवाहन, तुमच्या आशीर्वाद, शुभेच्छांमुळे माझी प्रकृती उत्तम, कोरोनावर यशस्वी मात करून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन -दादा भुसे

 

8:47 pm (IST)

'आजच्या बैठकीत महामंडळाबाबत चर्चा'
'दुसरा कुठला विषय बैठकीत झाला नाही'
बाळासाहेब थोरातांची बैठकीनंतर प्रतिक्रिया

8:29 pm (IST)

शिर्डी - कोरोना संकटातही साईबाबांना कोट्यवधींचं दान
14 दिवसांत दानपेटीत रोख 3 कोटी 17 लाख
93 ग्रॅम सोनं आणि 4 किलो चांदीही अर्पण
15 ते 28 डिसेंबरदरम्यानच्या दानाची‌ मोजदाद
मागील वर्षाच्या तुलनेत कमी प्रमाणात ‌दान
ऑनलाईनद्वारे मिळालेल्या दानाचा समावेश नाही

8:25 pm (IST)

राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांना कोरोनाची लागण
मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल

7:57 pm (IST)

गृहनिर्माण संस्थांसाठी 1 जानेवारीपासून मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेअन्स) विशेष मोहीम -सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

7:44 pm (IST)

मुंबई मनपा क्षेत्रातील शाळा 15 जानेवारीपर्यंत बंदच राहणार, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

7:30 pm (IST)

ईडीकडून वर्षा राऊतांना नवं समन्स
5 जानेवारीला हजर राहण्याचे आदेश

7:18 pm (IST)

पुण्यात हरणांचा कळपही रस्त्यावर, शिवण्यात एनडीएजवळील जंगलातून हरणांचा कळपानं जवळच्या सोसायटीत प्रवेश, जंगलात विविध प्राण्यांचा वावर, याच जंगलाला लागून असलेल्या शिवण्यातील आशीर्वाद सोसायटी हरणांचा कळप, सोसायटी आणि जंगल यांच्यामधील भिंत कोसळल्यानं हरणं थेट सोसायटीच्या आवारात

7:05 pm (IST)

'न्यूज18 लोकमत'च्या बातमीचा इम्पॅक्ट, ज्या ग्रामपंचायती जाहीर लिलाव करून बिनविरोध होत असतील त्याबाबत निवडणूक आयोगानं गुन्हे दाखल करावेत. निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याची हसन मुश्रीफांची माहिती, ही पद्धत लोकशाहीला घातक -ग्रामविकास मंत्री

6:58 pm (IST)

डीआरआयची विक्रोळी भागात कारवाई
डीआरआयनं 497 ग्रॅम हेरॉईन केली जप्त
हेरॉईनची बाजारातील किंमत दीड कोटी
द.आफ्रिकेहून कुरियरमार्गे हेरॉईन मुंबईत

 

Load More
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स