डॉ.बाबा आढाव जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत हमाल पंचायतबरोबर असहकार्याची भूमिका -पूना मर्चंट चेंबर्स
8:25 pm (IST)
गेल्या काही महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा प्रश्न चर्चेत आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे 3 पक्ष या आमदारांसाठी नावे पाठवणार आहेत. मात्र ही नावे अद्याप निश्चित न करण्यात आल्याने उद्या होणारी कॅबिनेटची बैठक रद्द करण्यात आली आहे. आता ही बैठक गुरुवारी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. कॅबिनेटच्या बैठकीत याबाबतचा ठराव करण्यात येणार आहे.
8:25 pm (IST)
राज्यात आज 5,363 नवीन रुग्ण आढळले
राज्यात आज 7,836 रुग्ण बरे होऊन घरी
राज्यात आज 115 कोरोनाबाधितांचा मृत्यू
राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 89.39%
8:11 pm (IST)
दीपिका पदुकोनच्या मॅनेजरच्या घरी एनसीबीचा छापा, करिश्मा प्रकाशच्या घरातून मिळाले अंमली पदार्थ, एनसीबीचे आणखी काही ठिकाणी छापे, एनसीबी मुंबई युनिटची कारवाई
6:30 pm (IST)
चंद्रपूर जिल्ह्यातील RT1 वाघ अखेर जेरबंद
वनविभागाच्या वतीनं गेले 8 महिने सुरू होतं अभियान
वनविभाग, राजुरा तालुक्यातील नागरिकांना दिलासा
राजुरा उपविभागात 8 ग्रामस्थांना वाघानं ठार मारलं होतं
6:05 pm (IST)
जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडतोय -अशोक चव्हाण
राजकारण करणाऱ्यांना राजकारण करू द्या -अशोक चव्हाण
'जर कोणी चांगलं वाटत असेल तर त्याला समितीवर घ्या'
मला काही हरकत नाही; अशोक चव्हाणांचं विरोधकांना उत्तर
5:26 pm (IST)
महामंडळाची स्थापना लवकरच होणार
डिसेंबर अखेरपर्यंत महामंडळासंदर्भात निर्णय
ऊसतोड मजुरांना जास्तीत जास्त फायदा देणार
5:06 pm (IST)
'व्हीएसआय'मध्ये शरद पवारांसोबत पार पडली बैठक, ऊसतोड कामगार संघटनांसोबत झाली चर्चा, हा 3 वर्षांचा करार झाला, ऊसतोड मजुरांना सरासरी 14 टक्के दरवाढ, प्रतिटन 35 ते 40 रुपयांची वाढ मिळणार, सर्व संघटनांनी संप घेतला मागे
4:52 pm (IST)
कांदा प्रश्नांबाबत केंद्राचे निर्णय शेतकऱ्यांसाठी अडचणीचे -छगन भुजबळ