• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • LIVE : मुंबईत सिलेंडरचा स्फोट; 5 जखमी तर 15 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

LIVE : मुंबईत सिलेंडरचा स्फोट; 5 जखमी तर 15 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | November 24, 2020, 23:23 IST
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  23:21 (IST)

  - मुंबईतील अंधेरी साकीनाका परिसरात एलपीजी सिलेंडरचा स्फोट

  - स्फोटात 5 जखमी तर 15 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

  - जखमींवर राजावाडी रुग्णलायत उपचार सुरू

  -  आनंद भुवन या चाळीत स्फोट

  21:37 (IST)

  राज्यपालनियुक्त विधानपरिषद 12 जागा
  विरोधी पक्षाकडून नवा पेच
  'आमच्या 12 सदस्यांना नियुक्त करा'
  रयत क्रांती सेना राज्यपालांना यादी देणार
  सदाभाऊ खोत उद्या राज्यपालांना भेटणार

  19:58 (IST)

  विहंग सरनाईक ईडी कार्यालयातून बाहेर
  विहंग सरनाईकची ईडी चौकशी संपली
  ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी

  19:34 (IST)

  राज्यात दिवसभरात 5,439 नवे रुग्ण
  राज्यात दिवसभरात 4,086 रुग्ण बरे
  राज्यात दिवसभरात 30 रुग्णांचा मृत्यू
  रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 92.69 टक्के

  19:15 (IST)

  लस वितरणाबाबत टास्क फोर्स स्थापन
  मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले होते निर्देश

  18:55 (IST)

  सीएम योगी आदित्यनाथांचा मोठा निर्णय
  यूपीत 'लव्ह जिहाद'च्या अध्यादेशाला मंजुरी

  18:8 (IST)

  मोदींसोबत सविस्तर चर्चा झाली -टोपे
  'मंत्रिमंडळ बैठकीत कोरोनाचा आढावा'
  लसीकरण संदर्भात सखोल चर्चा -टोपे
  देशात 5 व्हॅक्सिन तयार होत आहेत -टोपे
  '30 कोटी लोकांना प्राधान्यानं लस द्यायची'
  'लसीकरण कार्यक्रम पूर्णपणे केंद्र राबवणार'
  'महाराष्ट्रात समाधानकारक परिस्थिती'
  'जगाच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली'
  लोकांमध्ये पुन्हा जनजागृतीची गरज -टोपे
  'टेस्टिंगचं प्रमाण वाढवण्यावर भर देणार'
  सध्या आपण सेफ झोनमध्ये -आरोग्यमंत्री
  'राज्यात अद्याप कोरोनाची दुसरी लाट नाही'
  'लॉकडाऊनबाबत अद्याप कुठलाही निर्णय नाही'
  'काही निर्बंध लादण्यासंदर्भात विचार सुरू'
  आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

  17:46 (IST)

  केंद्राच्या संस्थांच्या माध्यमातून राजकीय व्यक्तीवर कारवाईचं कळलं, राजकीय फायदा केंद्रीय संस्था घेतंय, त्यातलाच हा प्रकार आहे -अनिल देशमुख

  17:23 (IST)

  धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी
  '2568 रुपये शेतकऱ्यांना हमीभाव देणार'
  राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
  '7 लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होणार'
  'इतर कोणत्याही राज्यात अशी सुविधा नाही'
  'साडेबाराशे कोटींचा भार सरकारवर येईल'
  'राज्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात'
  अजिबात घाबरण्याचं कारण नाही -वडेट्टीवार
  लॉकडाऊन हा पर्याय नाही -विजय वडेट्टीवार
  'चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका'
  'पुढील काही दिवसात परिस्थिती पाहून निर्णय'
  मदत-पुनर्वसन मंत्री वडेट्टीवारांची माहिती

  17:3 (IST)

  ठाणे - राबोडीतील जमील शेख हत्या प्रकरण
  मनसे पदाधिकाऱ्याची काल गोळ्या झाडून हत्या
  एका महिन्यात 2 पदाधिकाऱ्यांची अशीच हत्या
  दरेकरांकडून कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
  ठाणे पोलीस आयुक्तांशी साधला संपर्क
  'गुन्ह्यांतील आरोपींना तात्काळ अटक करा'
  विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची मागणी

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स