LIVE : पुन्हा राजकीय ठिणगी पेटणार,उद्धव ठाकरेंची मुलाखत लवकरच होणार प्रसारित
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स
Lokmat.news18.com | November 25, 2020, 10:15 PM IST
Last Updated November 25, 2020
auto-refresh
Highlights
10:15 pm (IST)
अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचं निधन, वयाच्या 60 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9:39 pm (IST)
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत दिनांक 27 नोव्हेंबर 2020 (शुक्रवार) रोजी प्रकाशित आणि प्रसारित केली जाणार आहे.
या मुलाखतीत उद्धव ठाकरे हे राज्यातील कोरोनाची स्थिती, विरोधी पक्षाने केलेली विविध आंदोलने आणि टीका यासांरख्या मुद्द्यावर भाष्य करण्याची शक्यता आहे.
9:38 pm (IST)
पुणे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा धोका वाढतोय
पुणे शहरासोबतच ग्रामीण भागात रुग्णवाढ
8:28 pm (IST)
शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनो, उद्याच्या संपात सहभागी होऊ नका अन्यथा शिस्तभंगाची कारवाई; विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनांनी पुकारला उद्या संप, संप मागे घेण्याचे सरकारचं आवाहन
8:14 pm (IST)
ठाण्यात मनसैनिकांना कलम 149 ची नोटीस
मोर्चा न काढण्याची पोलिसांची सूचना
मोर्चा काढल्यास कारवाईचा इशारा
ठाणे पोलिसांकडून मनसैनिकांना नोटीस
7:31 pm (IST)
कोरोना रुग्णसंख्येत आज मोठी वाढ
राज्यात दिवसभरात 6,159 नवे रुग्ण
राज्यात दिवसभरात 4,844 रुग्ण बरे
राज्यात दिवसभरात 65 रुग्णांचा मृत्यू
रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 92.64 टक्के
7:20 pm (IST)
नागपूर - ग्रामीणमधील शाळा होणार 13 डिसेंबरपासून सुरू, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरेंचा निर्णय
7:14 pm (IST)
पश्चिम रेल्वेनं येणारे 8 प्रवासी बाधित
राजस्थान,गुजरात,दिल्लीतून ट्रेन धावतात
आज सकाळपासून अँटिजेन टेस्टिंग सुरू
टेस्टिंगदरम्यान स्टेशनवर मोठी गर्दी
7:05 pm (IST)
शिर्डी - साई मंदिर खुलं झाल्यानंतर कोट्यवधींचं दान, 16 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत एकूण 3 कोटी 9 लाख 83 हजारांचं दान, 6 देशांतील परकीय चलनाचाही समावेश, सोनं 64.50 ग्रॅम तर 3 किलो 800 ग्रॅम चांदीही प्राप्त, 9 दिवसांत 48 हजार 224 भाविकांनी घेतला साई दर्शनाचा लाभ