LIVE : मुंबई पोलिसांनी सायन हॉस्पिटलच्या बड्या पदाधिकाऱ्याला केली अटक

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | December 24, 2020, 00:03 IST |
    LAST UPDATED 2 YEARS AGO

    हाइलाइट्स

    0:3 (IST)

    मुंबई पोलिसांनी सायन हॉस्पिटलच्या उच्चपदस्थ पदाधिकाऱ्याला केली अटक 
    - सायन हॉस्पिटल प्रशासनातील पदाधिकारी राकेश वर्मा यांना पोलिसांनी अटक केली आहे
    - मध्य प्रदेशातील मेडिकल विद्यार्थिनीला सायन मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश देण्यासाठी वर्मा यांनी 50 लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे
    - वर्मा यांनी अन्य काही विद्यार्थ्यांना फसवल्याचाही पोलिसांना संशय
    - याप्रकरणी अधिक तपास सुरू असून मोठा खुलासा होण्याची शक्यता

    22:2 (IST)

    वाशिम-पुसद महामार्गावर भीषण अपघात
    रेल्वे उड्डाणपुलाजवळ ट्रकची बैलगाडीला धडक
    शेतकरी दाम्पत्यासह 1 बैल ठार, 1 बैल गंभीर
    पती-पत्नी शेतातून घरी येत असताना दुर्घटना

    20:49 (IST)

    राज्य सरकारच्या निर्णयाचं स्वागत, पण वरातीमागून घोडे असं सरकारचं काम -विनायक मेटे

    20:24 (IST)

    शिवसेना आमदार राजन साळवींनी नाणारबाबत घेतलेली भूमिका योग्यच आहे, साळवींना त्यांच्या भूमिकेचा पक्षाकडून त्रास होत असेल तर त्यांनी भाजपात यावं, राजन साळवींना नाणार समर्थक म्हणून भाजपातून निवडून आणण्याची जबाबदारी आमची, रिफायनरी समर्थनाबाबत नितेश राणेंचा शिवसेना आमदार साळवींना पाठिंबा

    19:47 (IST)

    23 गावांचा पुणे मनपा हद्दीतील समावेश
    निर्णय राजकीय हेतूनं -चंद्रकांत पाटील
    'या गावांच्या विकासासाठी किती निधी?'
    राज्य सरकारनं स्पष्ट करावं -चंद्रकांत पाटील

    19:45 (IST)

    कोरोना रुग्ण आणि मृत्यूच्या संख्येत वाढ
    राज्यात दिवसभरात 3,913 नवे रुग्ण
    राज्यात दिवसभरात 7,620 रुग्ण बरे
    राज्यात दिवसभरात 93 रुग्णांचा मृत्यू
    रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 94.51 टक्के
    राज्यात सध्या 54,573 अॅक्टिव्ह रुग्ण 

    19:34 (IST)

    कंगना राणावतच्या वांद्रेस्थित घरात अवैध बांधकाम करण्यात आल्याच्या पालिकेच्या नोटिसीवर शिक्कामोर्तब, दीड महिन्यानंतर कंगनाच्या घरावर पालिका हातोडा चालवू शकते, दिंडोशी कोर्टाचा कंगनाला दणका, याचिकाकर्त्या कंगनाला 6 आठवड्यांची मुदत, 2018 साली पालिकेनं कंगनाच्या वांद्रेस्थित घरात अवैध बांधकाम झाल्याची नोटीस दिल्यानंतर कंगनानं तोडक कामावर कोर्टाकडून स्थगिती आणली होती

    19:7 (IST)

    पुणे मनपा हद्दीत 23 गावांचा अखेर समावेश
    नगरविकास खात्याकडून अध्यादेश जारी
    पुणे मनपाचं क्षेत्रफळ मुंबई मनपापेक्षाही मोठं होणार
    राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निर्णयाचं स्वागत

    18:38 (IST)

    मराठा आरक्षणाची केस न्यायप्रविष्ट असताना मराठा विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा, SEBC उमेदवारांना आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून शैक्षणिक प्रवेश घेता येणार, त्यामुळे SEBC विद्यार्थांना नोकरभरती आणि शिक्षणभरती यासाठी दिलासा

    18:21 (IST)

    नाशिक - भाजप आमदार देवयानी फरांदे अडचणीत, देवयानी फरांदेंवर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा, गुन्हेगाराच्या समर्थनार्थ पोलीस ठाण्यावर मोर्चा काढल्यानं गुन्हा दाखल

    कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स