• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • LIVE : गानतपस्वी पंडित प्रभाकर धर्माधिकारी यांचं 90 व्या वर्षी देहावसान

LIVE : गानतपस्वी पंडित प्रभाकर धर्माधिकारी यांचं 90 व्या वर्षी देहावसान

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | December 22, 2020, 23:03 IST
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  22:58 (IST)

  गानतपस्वी पंडित प्रभाकर धर्माधिकारी यांचे 90 व्या वर्षी देहावसान 

  22:58 (IST)

  - बोरीवली येथील गानतपस्वी पं प्रभाकर धर्माधिकारी यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.  ते 90 वर्षांचे होते. पंडितजींनी अतिशय खडतर मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात खूप मोठी मजल मारली. 1930 साली ग्वाल्हेर या संगीताच्या माहेर घरी त्यांचा जन्म झाला. तिथे माधव संगीत विद्यालयातून त्यांनी पं. कृष्णराव पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली संगीतरत्न आणि संगीतनिपुण या उच्च पदव्या मिळविल्या. 

  22:58 (IST)

  - अनेक संस्थाने, राज्यात जाऊन त्यांनी आपली कला सादर केली, रसिकांचं कौतुक मिळविलं आणि खूप नाव कमावले.  1957 मध्ये त्यांनी मुंबई गाठली. मुंबईत पं. लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले, पं. प्रल्हादबुवा गानु इ. अनेक नामवंत गुरूंकडून ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर अशा विविध घराण्यांच्या गायकीचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले.

  22:57 (IST)

  - 50 वर्षांहून अधिक काळ आपल्या सरस्वती संगीत विद्यालयातून शेकडो विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीताचे धडे दिले. अतिशय मनापासून संगीताच्या सेवेत आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी खर्ची घातले.

  22:57 (IST)

  - विविध अंगांनी नटलेली त्यांची गायकी ऐकायचे भाग्य अनेकांना लाभले आहे. त्यांनी स्वतः मेहनत करून गळ्यात घोटून घेतलेली सरगम ही त्यांच्या गायकीतली विशेष गोष्ट. असा हा संगीतातला सूर्य मावळला असला तरी यू ट्यूब आणि सीडीच्या रूपातून ते कायम आपल्या बरोबर राहतील, अशी भावना त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केली. त्यांच्या मागे त्यांची मुलगी, मुलगा असा परिवार आहे.

  21:6 (IST)

  आज मध्यरात्रीपासून 'नाईट कर्फ्यू' सुरू
  राज्यभरातील मनपा क्षेत्रात 'नाईट कर्फ्यू'
  'रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी'
  '5 पेक्षा अधिक जण एकत्र येण्यास बंदी'

  19:52 (IST)

  1 जानेवारीला भीमा-कोरेगावात शौर्यदिन
  'विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी गर्दी नको'
  'राजकीय सभा, पुस्तक स्टॉल लावण्यास मनाई'
  कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय

  19:42 (IST)

  राज्यात दिवसभरात 3,106 नवे रुग्ण
  राज्यात दिवसभरात 4,122 रुग्ण बरे
  राज्यात दिवसभरात 75 रुग्णांचा मृत्यू
  रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 94.3 टक्के
  राज्यात सध्या 58,376 अॅक्टिव्ह रुग्ण

  17:52 (IST)

  महाराष्ट्रात मॅग्नेटिक पॉवर असून जगातील लोक महाराष्ट्रात येऊ इच्छितात; उद्योजक हीच महाराष्ट्राची ताकद असून 'उद्योग मित्र' ही उत्तम संकल्पना - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  गेल्या वर्षभरात महाराष्ट्रानं सुमारे 2 लाख कोटींची गुंतवणूक आकर्षित केली आहे, त्यात कोविड काळात 6 महिन्यांतच 1 लाख 12 हजार कोटींची गुंतवणूक हे निश्चितच संपूर्ण देशासाठी महाराष्ट्राचं एक उदाहरण आहे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  17:39 (IST)

  महाराष्ट्रात मॅग्नेटिक पॉवर -उद्धव ठाकरे
  'जगातील लोक महाराष्ट्रात येऊ इच्छितात'
  उद्योजक हीच महाराष्ट्राची ताकद -मुख्यमंत्री
  'उद्योग मित्र' ही उत्तम संकल्पना -मुख्यमंत्री 

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स