liveLIVE NOW

LIVE : जानेवारी ते डिसेंबर असेल शैक्षणिक वर्ष? मुख्यमंत्र्यांनी दिली सूचना

मुंबई : महाराष्ट्र आणि देशातल्या महत्त्वाच्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्स एका क्लिकवर LIVE

 • News18 Lokmat
 • | August 20, 2020, 22:25 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED A YEAR AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  21:25 (IST)

  नागपूर जिल्ह्यात आज 989 कोरोनाचे रुग्ण आढळले
  नागपुरात कोरोना रुग्णांचा 17 हजारांचा आकडा पार
  नागपूर जिल्ह्यात दिवसभरात आज 46 रुग्णांचा मृत्यू
  नागपूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 17 हजार 722

  21:25 (IST)

  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा जाने. ते डिसें. असं शैक्षणिक वर्ष?
  शैक्षणिक वर्ष करता येईल का ते तपासावं -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  केंद्र सरकारसोबत विचारविनिमय करण्याच्या दिल्या सूचना
  चंद्रकांत पाटलांनी हीच सूचना करत मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं पत्र

  21:3 (IST)

  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा जाने. ते डिसें. असं शैक्षणिक वर्ष?
  शैक्षणिक वर्ष करता येईल का ते तपासावं -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  केंद्र सरकारसोबत विचारविनिमय करण्याच्या दिल्या सूचना
  चंद्रकांत पाटलांनी हीच सूचना करत मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं पत्र

  20:55 (IST)

  मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, पाण्याची चिंता मिटणार
  मुंबईला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव तुडुंब
  आज संध्याकाळी 7.5 मिनिटांनी तानसा वाहू लागला
  गेल्या वर्षी 25 जुलैला भरलेला तलाव यंदा 25 दिवस उशिरानं
  मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी महत्वाचा तलाव

  20:44 (IST)

  नवी मुंबईत आज तब्बल 477 कोरोनाचे रुग्ण आढळले
  नवी मुंबईत आज दिवसभरात 5 जणांचा मृत्यू
  नवी मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या 22 हजार 275

  20:19 (IST)

  महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा विक्रमी आकडा
  महाराष्ट्रात कोरोनाचे 14 हजार 492 नवे रुग्ण
  महाराष्ट्रात आज 12,242 रुग्ण बरे होऊन घरी
  महाराष्ट्रात आज दिवसभरात 326 रुग्णांचा मृत्यू
  रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 71.37 तर मृत्युदर 3.32 टक्के
  महाराष्ट्रात सध्या 1 लाख 62 हजार 491 अॅक्टिव्ह रुग्ण

  20:16 (IST)

  नवी मुंबई - पनवेलमध्ये कोरोनामुळे पितापुत्राचा दुर्दैवी अंत
  कोरोनामुळे अतिदक्षता विभागात वडिलांवर सुरू होते उपचार
  40 वर्षांच्या मुलाला वडील गेल्याचं कळताच हार्टअॅटॅक
  MGM रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सुरू होते उपचार
  पितापुत्राच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे पनवेल परिसरात शोककळा

  20:5 (IST)

  दिल्ली - प्रशांत भूषण प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा आदेश
  प्रशांत भूषण यांना बिनशर्त माफी मागण्याची संधी
  सोमवारी दिलगिरी व्यक्त केल्यास मंगळवारी सुनावणी होईल
  जर दिलगिरी व्यक्त न केल्यास सुप्रीम कोर्ट शिक्षा सुनावेल

  20:2 (IST)

  पिंपरी-चिंचवडमध्ये आज कोरोनाचे 1,131 नवे रुग्ण
  दिवसभरात 21 रुग्णांचा मृत्यू, 371 जण कोरोनामुक्त
  पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाग्रस्तांची संख्या 38 हजारांवर

  19:46 (IST)

  33 हजार 441 कोटींच्या अर्थसंकल्पाला अंतिम मान्यता

  मुंबई : महाराष्ट्र आणि देशातल्या महत्त्वाच्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्स एका क्लिकवर LIVE