LIVE NOW

LIVE : नगर जिल्ह्यातील भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात, मंत्र्यांनी केला दावा

कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स

Lokmat.news18.com | November 2, 2020, 10:24 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated November 2, 2020
auto-refresh

Highlights

10:23 pm (IST)

अहमदनगर - हे सरकार लवकरच पडेल असा दावा भाजपकडून केला जात आहे. मात्र राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजपचा दावा खोडून काढत टीकास्त्र सोडलं आहे. आमचे सरकार पाच वर्ष पूर्ण करणार यात कुठलीही शंका नाही.  यामुळेच पुढली पाच वर्ष आमचंच सरकार असेल. जिल्ह्यात भाजपमधील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे पुढील काळामध्ये भाजपातील अनेक नेते राष्ट्रवादीमध्ये येतील. हे नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत, असं प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलं आहे. 

9:54 pm (IST)

'माझं कुटुंब, माझी जबाबदारी' योजनेला मोठा प्रतिसाद
मुंबईतल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट -इक्बाल चहल
मृत्युदरही कमी झाल्याची मुंबई मनपा आयुक्तांची माहिती

9:43 pm (IST)

मराठा आरक्षणावर हे सरकार काहीच हालचाल करत नाही, मुलांचे अकरावीचे प्रवेश रखडलेत, त्यावर उद्धवजी तात्काळ निर्णय का घेत नाहीत? घटनापीठाकडे सुनावणी गेल्यानं लगेच काही स्थगिती उठणार नाही, मराठा आरक्षणावरील स्थगिती उठण्यासाठी सरकारनं चीफ जस्टिसकडे विनंती केली पाहिजे -चंद्रकांत पाटील

 

9:42 pm (IST)

हसन मुश्रीफांचे आरोप निराधार -चंद्रकांत पाटील
मुश्रीफांचा दावा हास्यास्पद -चंद्रकांत पाटील
'अशा स्टोरीमधून लोकांची करमणूक होते'
कोरेंकडे सांत्वन करायला गेलो होतो -चंद्रकांत पाटील
'अशा विषयाची चर्चा तिथं होऊ शकत नाही'

8:57 pm (IST)

कोल्हापुरातील कोणीपण कुठल्याही विधानसभेचा राजीनामा द्या, आता राजीनामा देऊन पोटनिवडणूक लावा, निवडून नाही आलो तर राजकारण सोडेन, चंद्रकांत पाटलांचं ओपन चॅलेंज

8:00 pm (IST)

बेस्टच्या सेवेतील एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा
'सर्व एसटी कर्मचाऱ्यांना रोज रोख भोजनभत्ता देणार'
परिवहन मंत्री अनिल परब यांची घोषणा
'न्यूज18 लोकमत'च्या बातमीचा इम्पॅक्ट

 

7:36 pm (IST)

राज्यात दिवसभरात 4,009 नवे रुग्ण
राज्यात दिवसभरात 10,225 रुग्ण बरे
राज्यात दिवसभरात 104 रुग्णांचा मृत्यू
रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 90.31 टक्के

 

7:21 pm (IST)

माजी महाधिवक्ता श्रीहरी अणेंची 'न्यूज18 लोकमत'ला एक्सक्लुझिव्ह मुलाखत, राज्यपालांना विशेष अधिकार, राज्यपालांच्या निवडीला आव्हान देता येत नाही, राज्यपाल नावं परत पाठवू शकतात -श्रीहरी अणे

 

7:02 pm (IST)

कल्याण-शीळ रोडवर पुन्हा पाईपलाईन फुटली
पाईपलाईन फुटल्यानं हजारो लीटर पाणी वाया
पडलेगाव-खिडकाळीमधील घटना

6:58 pm (IST)

MIDC, विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करार
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करारांवर स्वाक्षरी
15 कंपन्यांमार्फत ₹34,850 कोटींची गुंतवणूक
सुमारे 23,182 लोकांना रोजगार उपलब्ध होणार

Load More
कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स