LIVE: कुलाबा वेधशाळेनं दिलेला अंदाज खरा ठरला, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस
कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर
Lokmat.news18.com | October 18, 2020, 9:54 PM IST
Last Updated October 18, 2020
auto-refresh
Highlights
9:54 pm (IST)
जळगाव - सुशांतसिंह हे भाजपचं पिल्लू -गुलाबराव पाटील
'बिहारच्या 8 टक्के राजपूत मतांसाठी राजकारण'
कोरोना हे सुद्धा पिल्लू असल्याचा केला अजब आरोप
मुख्यमंत्री ठाकरे हे कोरोनाबाबत गंभीर -गुलाबराव पाटील
9:44 pm (IST)
आयडॉलच्या अंतिम वर्ष परीक्षेच्या तारखा जाहीर
मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलच्या परीक्षा उद्यापासून
21 पैकी 17 परीक्षांना उद्यापासून होणार सुरुवात
8:03 pm (IST)
राज्यात आज कोरोनाचे 9 हजार 60 नवे रुग्ण
राज्यात आज 150 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
राज्यात आज 11 हजार 204 रुग्ण बरे होऊन घरी
राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 85.86 टक्के
7:27 pm (IST)
खडसेंनी पक्षाचा राजीनामा दिला नाही -चंद्रकांत पाटील
नाथाभाऊ पक्षाचा राजीनामा देणार नाहीत -चंद्रकांत पाटील
'असं करून ते स्वत:चं नुकसान करून घेणार नाहीत'
गडचिरोली : C-60 कमांडो पथकाची माओवाद्यांशी चकमक
चकमकीत 5 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश
कसनेलीच्या जंगलातील चकमकीत 5 माओवादी ठार
या वर्षातील माओवाद्यांविरोधातली सर्वात मोठी कारवाई
3:50 pm (IST)
'कोरोनाविरोधातला लढा निर्णायक वळणावर'
आजही मास्क हीच आपल्यासाठी लस -मुख्यमंत्री
रत्नागिरीतल्या प्लाझ्मा उपचार केंद्राचं उद्घाटन
3:24 pm (IST)
महाराष्ट्रात 155 लाख हेक्टरवर नुकसान -अनिल बोंडे
राज्यातील शेतकरी हवालदिल -अनिल बोंडे
'अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळानं खरीप भुईसपाट'
अस्मानी संकटात सुल्तानानं सावरायचं असतं -बोंडे
मात्र सरकारला अजून जागच आली नाही -अनिल बोंडे
माजी कृषीमंत्री अनिल बोंडेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
राज्यातील शेतकऱ्यांना मदतीची गरज -अनिल बोंडे
तुम्ही शेतकऱ्यांना दिलेलं वचन पूर्ण करा -अनिल बोंडे
1:48 pm (IST)
सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा -चंद्रकांत पाटील
'सत्तेत नसताना सरसकट मागणी, आता पंचनामे कशाला?'
चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला
'महाराष्ट्रावर संकट आलं त्यावेळी केंद्रानं मदत केलीय'
तोपर्यंत राज्य सरकारनं मदत केली पाहिजे -चंद्रकांत पाटील
12:32 pm (IST)
'राज्यपालांच्या पत्रातील भाषेवर अमित शाह नाराज'
अमित शाहांच्या वक्तव्यामुळे 'मविआ' आक्रमक
राज्यपाल नियुक्त आमदारांची नावं सरकार पाठवणार
तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी 4 नावांची यादी पाठवणार
राज्यपालांच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष