LIVE NOW

LIVE : राणा दाम्पत्याला अटक केल्याप्रकरणी कार्यकर्त्यांनी रोखून धरली विदर्भ एक्सप्रेस

कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स

Lokmat.news18.com | November 15, 2020, 9:20 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated November 15, 2020
auto-refresh

Highlights

8:55 pm (IST)

दिल्ली - कोरोना चाचण्यांची संख्या दुप्पट होणार
वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर निर्णय
अमित शाहांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

8:46 pm (IST)

अमरावती - राणा दाम्पत्य अटक प्रकरण
बडनेरा रेल्वे स्टेशनवर आंदोलन
कार्यकर्त्यांनी रोखून धरली विदर्भ एक्स्प्रेस

8:00 pm (IST)

गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात एकनाथ शिंदेंनी साजरी केली दिवाळी, जवानांच्या कुटुंबीयांसोबत दिवाळीचा सण साजरा

7:14 pm (IST)

कोरोना काळात वाढीव वीजबिलात सवलतीची शक्यता मावळली, वीजबिल वसुलीचे महावितरणचे निर्देश, महावितरणनं दिलेली बिलं कशी योग्य आहेत हे ग्राहकांना समजवून सांगा, महावितरणची सूचना; ग्राहकांना टप्प्याटप्प्यानं वीजबिल भरण्याची सुविधा, थकबाकी वसुलीसाठी जनजागृती करावी

7:07 pm (IST)

राज्यातील आणखी एका नेत्याकडे राज्याबाहेरील निवडणुकीची जबाबदारी, आगामी हैदराबाद मनपा निवडणुकीसाठी भाजप नेते आशिष शेलार सहप्रभारी तर भूपेंद्र यादव प्रभारी

7:03 pm (IST)

अमरावती - राणा दाम्पत्याला घेतलं ताब्यात
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रवी राणा आक्रमक
'मातोश्री'बाहेर आंदोलनाचा दिलेला इशारा
'सीएमना भेटू न देणं म्हणजे लोकशाहीची हत्या'
खासदार नवनीत राणांची संतप्त प्रतिक्रिया
पोलीस आयुक्त कार्यालयात केलं हजर

 

6:34 pm (IST)

पंढरपूर - विठ्ठल मंदिर उद्या उघडणार
श्री विठ्ठल-रुक्मिणीचं मुखदर्शनच मिळणार
पदस्पर्श दर्शन सध्या तरी नाही
काटेकोर नियमांचं पालन बंधनकारक
सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत दर्शन कालावधी

6:21 pm (IST)

शिरूर तालुक्यातील धक्कादायक प्रकार
कवठे येमाईच्या काळूबाईनगर इथली घटना
खड्ड्यातील पाण्यात पडून चिमुकलीचा मृत्यू
ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

6:05 pm (IST)

प्रेयसीला अॅसिड, पेट्रोल टाकून जाळलं
बीडच्या येळंब घाट परिसरातील प्रकार
नराधम प्रियकर अविनाश राजुरेला अटक
देगलूर पोलिसांकडून आरोपी गजाआड
आरोपीला बीड पोलिसांच्या स्वाधीन करणार

5:09 pm (IST)

साई मंदिरात कोविडचे नियम पाळून दर्शन
सरकारच्या निर्देशानुसार साईदर्शन व्यवस्था
65 वर्षांवरील लोकांना दर्शनबंदी
लहान मुलं, गरोदर महिलांना दर्शनाला मनाई
दर्शनबारीत 6 फुटांचं अंतर ठेवावं लागणार
मास्क लावणं बंधनकारक असणार
कोणतीही लक्षणं नाहीत त्यांनाच साईदर्शन
संशयित भाविकांची शिर्डीत होणार टेस्ट
साईंच्या चारही आरतीला 80 लोकांना मुभा
शिर्डीतील ग्रामस्थांना सकाळी 1 तास दर्शन 
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची माहिती

Load More
कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स...