LIVE : वीज कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर, ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी केली घोषणा

कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | November 13, 2020, 22:59 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  22:56 (IST)

  BREAKING :

  - वीज कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर 
  - ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी केली घोषणा
  - संप होणार नाही....दिवाळीत नागरिकांना मोठा दिलासा
  - 14 तारखेपासून पुकारला होता संप
  -  महावितरण, पारेषण आणि निर्मिती या तिन्ही विभागाचे कर्मचारी यांनी पुकारला होता संप
  - अंदाजे 125 कोटी रुपयांचा बोजा

  21:29 (IST)

  पुण्यात दिवसभरात 226 रुग्णांची वाढ
  पुण्यात दिवसभरात 367 रुग्णांना डिस्चार्ज
  पुण्यात दिवसभरात 7 रुग्णांचा मृत्यू
  पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 4376
  पुण्यातील एकूण कोरोना रुग्ण 1,64,341
  पुण्यात आतापर्यंत 4373 रुग्णांचा मृत्यू
  पुण्यात आतापर्यंत 1,55,592 डिस्चार्ज 

  20:9 (IST)

  पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्राचा सुपुत्र शहीद
  कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातील जवानाला वीरमरण
  बहिरेवाडीतील जवान ऋषिकेश रामचंद्र जोंधळे शहीद

  19:32 (IST)

  शिक्षकांसाठी रेल्वेबाबत मोठी बातमी
  लोकलमधून शिक्षकांना प्रवास करता येणार
  शाळेच्या कर्मचाऱ्यांनाही रेल्वे प्रवासाची मुभा
  राज्य सरकारच्या पत्रानंतर रेल्वे बोर्डाची मान्यता 

  18:54 (IST)

  बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरण
  अभिनेता अर्जुन रामपालची आजची चौकशी पूर्ण
  एनसीबीकडून अर्जुनची तब्बल 6 तास चौकशी
  NCB अधिकारी समीर वानखेडे यांची माहिती
  अर्जुनला पुन्हा चौकशीला बोलावणार -एनसीबी 

  18:17 (IST)

  ऐन दिवाळीत पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन
  जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर गोळीबार
  उरी, पूँछ, तंगधार, गुरेज भागात गोळीबार
  पाकच्या गोळीबाराला भारताचं चोख प्रत्युत्तर
  पाकिस्तानी सैन्याचे 2 सैनिकी तळ उद‌्ध्वस्त
  भारताचे 4 जवान शहीद, 3 स्थानिकांचा मृत्यू
  भारताच्या कारवाईत पाकचे 7 सैनिक ठार
  पाकिस्तानचे 3 कमांडोही ठार 
  'LOC'वर भारतीय जवानांची मोठी कारवाई 

  17:23 (IST)

  जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर गोळीबार
  उरी, पूँछ भागात पाकिस्तानचा गोळीबार
  पाकच्या गोळीबाराला भारताचं चोख प्रत्युत्तर
  पाकिस्तानी सैन्याचे अनेक बंकर्स उद‌्ध्वस्त
  भारताचे 4 जवान शहीद, 3 नागरिक ठार
  भारताच्या कारवाईत पाकचे 6-7 सैनिक ठार 

  16:26 (IST)

  दिवाळीनिमित्त अयोध्येत खास कार्यक्रम
  शेकडो दिव्यांनी उजळणार अयोध्या नगरी
  संध्याकाळी अयोध्येत होणार दीपोत्सव
  योगी आदित्यनाथ होणार सहभागी 

  15:50 (IST)

  महाराष्ट्रात पाण्याची समस्या -शरद पवार
  'पाणी कमी असूनही शेतकरी ऊस लावतात'
  ...आणि नंतर शेतीच अडचणीत येते -पवार
  'जिथं पाणी कमी, तिथं ऊस लावून उपयोग नाही'
  हे आता शेतकऱ्यांच्या लक्षात आलंय -पवार
  त्यामुळे फळबागाची संख्या वाढतेय -शरद पवार
  'फळबागांमध्ये जगात भारत दुसऱ्या क्रमांकावर'

  13:56 (IST)

  नंदुरबार - कार पुलावरून कोसळली 
  अपघातात 3 ठार, 2 जण जखमी
  धुळे-सुरत मार्गावर कोंडाईबारी घाटातील घटना

  कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स