liveLIVE NOW

LIVE : स्वामी अग्निवेश यांचं निधन, 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोरोना व्हायरससंदर्भातील महत्त्वाचे अपडेट्स आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.

 • News18 Lokmat
 • | September 11, 2020, 20:06 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED A YEAR AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  21:25 (IST)

  मल्लिकार्जुन खरगेंकडून महाराष्ट्राचं प्रभारीपद काढलं
  महाराष्ट्राच्या प्रभारीपदी एच.के. पाटील यांची नियुक्ती

  21:5 (IST)

  गृहविभागानं कंगना राणावतभोवतीचा फास आवळला
  अभिनेत्री कंगनाची ड्रग्ज प्रकरणी चौकशी होणार?
  ड्रग्ज प्रकरणात 8 बॉलिवूडचे सेलिब्रिटी अडचणीत?
  मुंबई पोलीस आयुक्तांकडून कंगनाच्या चौकशीचे आदेश

  20:40 (IST)

  नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे 1551 नवे रुग्ण
  जिल्ह्यात 15 रुग्णांचा मृत्यू, 1130 रुग्णांना डिस्चार्ज
  नाशिक शहरात कोरोनाचा वाढता विळखा
  रुग्णसंख्येत आणि रुग्ण प्रमाणात वेगवान वाढ

  नागपूर जिल्ह्यात आज 2 हजार 60 कोरोना रुग्णांची नोंद
  नागपूर जिल्ह्यात आज कोरोनामुळे 53 रुग्णांचा मृत्यू
  नागपूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 48 हजार 550

  20:23 (IST)

  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्याची चिंता वाढली
  राज्यात आज कोरोनाच्या 24,886 नव्या रुग्णांची नोंद
  राज्यात आज दिवसभरात 393 रुग्णांचा मृत्यू
  राज्यात आज 14 हजार 804 रुग्णांना डिस्चार्ज
  राज्यात रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 70.4% तर मृत्युदर 2.83%
  राज्यात सध्या 2 लाख 71 हजार 566 अॅक्टिव्ह रुग्ण

  20:9 (IST)

  परभणी-हैदराबाद-परभणी ही विशेष रेल्वे उद्यापासून धावणार, दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाची माहिती, रोज रात्री परभणीहून 10.30 वाजता सुटणार रेल्वे, फक्त आरक्षित प्रवासी करू शकणार प्रवास

  20:4 (IST)

  आर्य समाजाचं नेतृत्व करणाऱ्या स्वामी अग्निवेश यांचं वयाच्या 79 व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. मागील 2-3 दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्यावर इन्स्टिट्यूट ऑफ़ लीवर अँड बिलिअरी सायन्सेस (ILBS) या रुग्णालयात उपचार सुरू होते.

  19:42 (IST)

  राज्याची राजधानी मुंबईतील कोरोना स्थिती पुन्हा एकदा भयानक रुप धारण करत आहे. मध्यंतरीच्या काळात मुंबईतील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधी वाढत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत होतं. मात्र आता हा कालावधी लक्षणीयरित्या कमी होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील हा दर 90 दिवस इतका होता. मात्र आता मुंबईत अवघ्या 58 दिवसांत रुग्ण दुप्पट होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. 

  19:33 (IST)

  पिंपरी-चिंचवडमध्ये आज कोरोनाचे 1,331 नवे रुग्ण
  पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनामुळे 41 रुग्णांचा मृत्यू
  पिंपरी-चिंचवडमध्ये आज 1,272 जण कोरोनामुक्त

  19:21 (IST)

  चंद्रपूर - महापुरानं उद‌्ध्वस्त झालेल्या वैनगंगा भागाचा दौरा
  केंद्रीय पथकाकडून गावशिवारात शेतीच्या नुकसानीची पाहणी
  पथकानं किन्ही गावात केली घरांच्या पडझडीची पाहणी
  ग्रामस्थांसोबत संवाद साधून केंद्रीय पथक गडचिरोलीला रवाना

  18:29 (IST)

  मराठा आरक्षणासंदर्भात 'वर्षा'वरील बैठक संपली
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झाली बैठक
  मराठा आरक्षण समिती - मराठा नेत्यांसोबत होती बैठक
  उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणही होते उपस्थित
  अंतरिम आदेश रद्द करता यावा? अध्यादेश काढता येईल का?
  यासह अन्य पर्यायांचा विचार सरकार करतंय -मुख्यमंत्री
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बैठकीत सर्वांशी केली चर्चा
  मराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी लढणार -मुख्यमंत्री
  'तसूभरही मागे हटणार नाही, हा लढा आपल्या सर्वांचा आहे'
  'आरक्षण रद्द होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार'
  सरकार याप्रश्नी सुरुवातीपासून प्रामाणिक -मुख्यमंत्री
  तळमळीनं हा प्रश्न सोडवू इच्छिते -मुख्यमंत्री

  मुंबई, 11 सप्टेंबर : कोरोना व्हायरससंदर्भातील महत्त्वाचे अपडेट्स आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.