फडणवीसांना प्रत्युत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीचा एकत्रित हल्लाबोल

महाराष्ट्राच्या हक्काचे पैसेही केंद्र सरकार देत नसल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या हक्काचे पैसेही केंद्र सरकार देत नसल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे.

  • Share this:
    मुंबई, 27 मे :'देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की 1750 कोटी रुपयांचे गहू केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळाले. पण प्रत्यक्षात मात्र इतके गहू महाराष्ट्राला मिळालेच नाहीत. ट्रेनबाबतही फडणवीसांनी खोटा दावा केला. मजुरांसाठी ट्रेनबाबत केंद्र सरकारकडून गोंधळ सुरू आहे. दिलेल्या वेळेत ट्रेन न आल्याने मजुरांना ताटकळत उभं केलं जात आहे. ट्रेनच्या वेळा उलटसुलट केल्या आहेत. गुजरात राज्य महाराष्ट्रापेक्षा छोटं असताना त्यांना 1500 ट्रेन दिल्या तर आपल्याला केवळ 700 ट्रेन देण्यात आल्या,' असं म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याला खोडून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसंच महाराष्ट्राच्या हक्काचे पैसेही केंद्र सरकार देत नसल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारने महाराष्ट्राला केलेल्या मदतीचा दावा खोडून काढण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते बाळासाहेब थोरात, जयंत पाटील आणि अनिल परब यांनीही पत्रकार परिषद घेतली आहे. काय होता फडणवीसांचा दावा? 'केंद्र सरकार महाराष्ट्राला काही देत नाही, असा आरोप केला जात आहे. त्यामुळे केंद्राने राज्याला आत्तापर्यंत कोणती मदत केली, त्याबाबत मी सविस्तर माहिती देत आहे. गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत मोठी मदत करण्यात आली. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, महिला, ज्येष्ठ नागरिक यांनाही आर्थिक मदत करण्यात आली. अशा विविध योजनांतून केंद्राने महाराष्ट्राला हजारो कोटींची मदत केली आहे,' असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 'राज्य सरकार केंद्रातून आलेले पैसे खर्च करताना दिसत नाहीये. मार्च महिन्याच्या शेवटच्या काळात खर्च झालेले पैसे पाहिले तर आपल्याला कळेल की सरकारचा प्राधान्यक्रम आहे. मी उद्धवजींचं मूल्यमापन करण्यासाठी इथं बसलेलो नाही...तो माझा अधिकारही नाही...पण राज्याला सध्या एका आश्वासक नेतृत्वाची गरज आहे. आम्हाला त्यांच्याकडून ठोस निर्णयांची अपेक्षा आहे,' असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
    First published: