खदखद असेल तर योग्य ठिकाणीच मांडली पाहिजे; फडणवीसांचा खडसेंना टोला

खदखद असेल तर योग्य ठिकाणीच मांडली पाहिजे; फडणवीसांचा खडसेंना टोला

पक्ष एकसंघ राहील ही खात्री आहे, असा विश्वास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. एकनाथ खडसे बंडाच्या पवित्र्यात असल्याच्या बातम्यांवर पहिल्यांदाच फडणवीसांनी भाष्य केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 13 डिसेंबर : दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिवसानिमित्त गोपीनाथगडावर झालेल्या कार्यक्रमात एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये अन्याय होत असल्याची खदखद व्यक्त केली. त्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. "एकनाथ खडसेंनी अशा प्रकारे त्यांनी बोलायला नको होतं. ते व्यासपीठ त्यासाठी नव्हतं", असं फडणवीस म्हणाले. आपलं तिकीट का कापलं असा एकनाथ खडसे यांचा प्रश्न असेल, तर त्यांनी केंद्रीय नेतृत्वाला विचारावं. त्यांना तिथून उत्तर मिळेल, असंही ते म्हणाले.

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी मुंडे आणि खडसे यांच्या पक्ष सोडून जायच्या चर्चांवर भाष्य केलं. पक्ष एकसंघ राहील, हा विश्वास आहे, असं माजी मुख्यमंत्री म्हणाले. भाजपमध्ये ओबीसींवर अन्याय होत नाही. हा ओबीसींचाच पक्ष आहे, असं ते म्हणाले. खडसेंबद्दल किंवा ओबीसी समाजाबद्दल राग असता तर त्यांच्या मुलीला पक्षाने तिकीट दिलंच नसतं, असंही ते म्हणाले.

खडसेंवर आरोप झाले म्हणून त्यांना राजीनामा द्यायला लावला हे खोटं आहे. पक्ष म्हणून मी त्यांच्या पाठिशी होते. कुण्या एका संशयित आरोपीच्या सांगण्यावरून तर खडसे यांना नक्कीच काढलं गेलेलं नाही.  खडसेंवर आरोप लागले, त्यानंतर मी तातडीने त्याच्या चौकशीचे आदेश ATS ला दिले आणि 12 तासात एटीएसने तो आरोप खोटा आहे हा रिपोर्ट दिला. एटीएसने एकनाथ खडसेंना क्लीन चीट दिली. पण कसं आहे, पराभवाची चर्चा जास्त होते. पक्षाला जिंकून देखील हरावं लागलं त्यामुळे जास्त चिंतन  केंद्रीय नेतृत्वाने दिलं. खडसेंना तिकीट देणं न देणं हा केंद्रीय नेतृत्वाने हा निर्णय होता. तिकीट का कापलं याचं कारण एकनाथ खडसेंना हवं असेल  तर केंद्रीय नेतृत्व ते कारण देईल. पण पक्षात श्रेष्ठींकडे तक्रारी करता येतात. खदखद होती, तर योग्य ठिकाणी व्यक्त करायला हवी होती, असं फडणवीस म्हणाले.

'पंकजाताईंच्या मी कायम पाठीशी'

मुंडे साहेबांचं स्मारक आम्ही बांधलं नाही हे चूक आहे. स्मारकाचं डिझाईन पूर्ण व्हायला वेळ लागला. मुंडेंच्या कामावर जे सरकार तयार झालं होतं, त्याच म्हणजे आमच्या सरकारने त्यासाठी आधीच 45 कोटी रुपये दिले आहेत. त्याच्या कामाची सुरुवात होतेय, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. पंकजाताईंच्या पाठीशी नेहमी उभा होतो, असं ते म्हणाले.

------------------

अन्य बातम्या

हिवाळी अधिवेशनात भाजपमध्ये मोठा भूकंप, काँग्रेसच्या मंत्र्याने वर्तवलं भाकित

...म्हणून महिलेनं मंत्रालयात केला आत्महत्येचा प्रयत्न, धक्कादायक माहिती समोर!

भाजपमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न, भाजप आमदाराने केलं पंकजांचं समर्थन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2019 08:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading