LIVE Updates :  विरोधक पण संघाचे झाले पाहिजे, त्यासाठी त्यांनी संघाच्या शाखेत येणे गरजेचे नाही - मोहन भागवत

कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | August 09, 2022, 19:03 IST
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:17 (IST)

  कोल्हापूर - पंचगंगेनं इशारा पातळी ओलांडली
  कोल्हापूरला पुराचा विळखा, 71 बंधारे पाण्याखाली
  नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतराच्या सूचना
  कोल्हापूर महापालिकेनं उभारली निवारा केंद्रे
  प्रयाग, चिखलीच्या लोकांनाही सतर्कतेच्या सूचना

  19:49 (IST)

  बाळासाहेबांना स्मरून शपथ - गुलाबराव पाटील
  'उत्तर महाराष्ट्राला 5 मंत्रिपदं मिळाली'
  'आम्ही शिवसेना वाचवणारे शिवसैनिक'
  राजकारणात काहीही होऊ शकतं - गुलाबराव
  सेना-भाजप युतीचे गुलाबराव पाटलांचे संकेत

  19:32 (IST)

  आदिवासी समाजाच्या विकासासाठी आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 11 हजार 199 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद,  नागपूर इथं आदिवासी बांधवांसाठी गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालय आणि प्रशिक्षण केंद्र सुरू करणार; आदिवासी बांधवांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकास करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  18:58 (IST)

  सप्टेंबरमध्ये पुढचा मंत्रिमंडळ विस्तार - उदय सामंत
  अपक्ष आणि मित्रपक्षांची नाराजी दूर होणार - सामंत

  18:57 (IST)

  संघटनेचा नेता स्टेटसमागे धावणारा नसावा - भागवत
  'आपण दिसलो की नाही हे गुगलवर सर्च करणं अयोग्य'

  18:55 (IST)

  'कधी जनता संघालाही देश चालवायचा ठेका देईल'
  मात्र संघ देश चालवायचा ठेका घेणार नाही - भागवत

  18:53 (IST)

  भाजप प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी चेहरा - सूत्र
  संजय कुटे यांच्या नावाची चर्चा सुरू - सूत्र

  18:38 (IST)

  विरोधकही संघाचे झाले पाहिजेत - मोहन भागवत
  'त्यासाठी त्यांनी संघ शाखेत येणं गरजेचं नाही'
  आम्ही बुद्धिनिष्ठ नाही - मोहन भागवत
  'अनुभवातून जे शिकतो त्यानुसार वागतो'

  18:36 (IST)

  पुणे - हडपसर इथं शाळेच्या बसला आग
  अग्निशमनकडून आगीवर वेळीच नियंत्रण
  शाळेला सुट्टी असल्यानं मोठा अनर्थ टळला
  स्कूल वाहतूक सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

  18:33 (IST)

  चंद्रपूर - वर्धा नदीकाठच्या गावाला पुराचा धोका
  प्रशासनाकडून ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा
  पळसगावातील गावकऱ्यांचं केलं स्थलांतर

  कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स