LIVE Updates : मुंबईच्या रे रोड परिसरात भीषण अग्नितांडव, 9 झोपड्या जळून खाक

कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | August 07, 2022, 23:10 IST
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:44 (IST)

  मुंबईच्या रे रोड भागातील आग नियंत्रणात
  आगीत 9 झोपड्या जळाल्या, जीवितहानी नाही

  21:46 (IST)

  - नाशिक शहरात अचानक पडलेल्या मुसळधार पावसाने गोदावरीला पूर
  - गोदा काठावर पार्किंग केलेली अनेक वाहन पाण्यात
  - गोदा काठावरील दुकानांना आणि वाहनांना अचानक आलेल्या पुराने घातला वेढा
  - पुराच्या पाण्यात अडकलेली वाहने काढण्यासाठी स्थानिक यंत्रणांच्या मदतीने प्रयत्न सुरू

  21:29 (IST)

  नाशिक - मुसळधार पावसानं गोदावरीला पूर
  गोदाकाठी पार्किंग केलेली अनेक वाहनं पाण्यात
  दुकानं, वाहनांना अचानक आलेल्या पुराचा वेढा
  वाहनं काढण्यासाठी स्थानिकांच्या मदतीनं प्रयत्न

  20:27 (IST)

  दिल्लीत ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी आलो होतो, लालूप्रसाद यादवांची भेट घेतली, त्यांना ओबीसींचा मसिहा अशी गिफ्ट दिली, मी एनडीएसोबत आहे - महादेव जानकर

  19:54 (IST)

  'दिल्लीत ओबीसी जनगणना मागणीसाठी आलो होतो'
  लालूप्रसाद यादवांची भेट घेतली - महादेव जानकर
  'लालूंना ओबीसींचा मसिहा अशी गिफ्ट दिली'
  मी एनडीएसोबत आहे - महादेव जानकर

  19:37 (IST)

  - पवई आयआयटीत शुल्कवाढ विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रसचं आंदोलन
  - राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते अमोल मातेले यांच्या नेतृत्वात - आठवड्याभरापासून आंदोलन सुरु
  - प्रशासनाकडून अद्यापही आंदोलनाची दखल घेतली गेली नाही

  19:19 (IST)

  कॉमनवेल्थमध्ये भारताला आणखी एक 'सुवर्ण'
  50 किलो वजनी गटात पटकावलं सुवर्णपदक

  बॉक्सर निखत जरीनचा शानदार विजय
   
  18:55 (IST)

  एकनाथ खडसेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका
  या राज्यात अजून मंत्रिमंडळ विस्तार नाही - खडसे
  '37 दिवसांनंतरही सरकारचा पोरखेळपणा सुरूच'
  राज्यात दोघांचा कारभार सुरू - एकनाथ खडसे
  'एक मुख्यमंत्री, दुसरा बिनखात्याचा उपमुख्यमंत्री'
  साऱ्या फायलींचा मुख्यमंत्र्यांकडे ढीग - एकनाथ खडसे
  सरकार अडीच वर्षं टिकेल असं वाटत नाही - खडसे
  'एका वर्षात निवडणुका लागल्या तर आश्चर्य नको'
  निर्णय घ्यायला कोणी नाही, जनता हवालदिल - खडसे

  17:19 (IST)

  दिल्लीत नीती आयोगाची बैठक पडली पार
  मुख्यमंत्री आयोगाच्या बैठकीला होते उपस्थित
  'कृषी विभागात मोठे बदल करण्यावर चर्चा'
  'जमीन सिंचनाखाली कशी येईल? यावर चर्चा'
  शेतीमधल्या बदलांबाबत बैठकीत चर्चा - शिंदे
  जलयुक्त शिवार योजनेसंदर्भात चर्चा - शिंदे
  तेल आयात कमी करण्यावर भर - मुख्यमंत्री
  तेल उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न - एकनाथ शिंदे
  'शिक्षण क्षेत्राबद्दलही नीती आयोग बैठकीत चर्चा'
  ग्रामीण भागात शिक्षणपद्धती सुधारणार - शिंदे
  राष्ट्रीय शिक्षण योजना राज्यात राबवणार - शिंदे
  डिजिटल शिक्षणावर भर देणार - एकनाथ शिंदे
  राज्यात 'आपले गुरुजी' उपक्रम - एकनाथ शिंदे
  वर्गात शिक्षकांचे फोटो लावणार - एकनाथ शिंदे
  समृद्धी महामार्गाबाबत बैठकीत चर्चा - शिंदे
  बॉंडच्या माध्यमातून नगरपालिकांना निधी - शिंदे
  एक खिडकी सेवा योजनेवर भर देणार - शिंदे
  स्वच्छता, कचरा व्यवस्थापनावर भर देणार - शिंदे
  'राज्यातील प्रकल्पांना चालना देण्याचा प्रयत्न'
  तलावांचंही सुशोभीकरण करण्यावर चर्चा - शिंदे
  राज्याला सहकार्य करण्याची पंतप्रधानांना विनंती'
  'राज्य सरकार चांगल्या पद्धतीनं काम करतंय'
  लोकसभेसाठी युतीचं मिशन 48 आहेच - शिंदे
  निर्यात वाढण्यासंदर्भात बैठकीत चर्चा - मुख्यमंत्री
  प्रस्तावांवर मोदींचा सकारात्मक प्रतिसाद - शिंदे
  लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार - एकनाथ शिंदे
  'अजितदादांना लवकरच तारीख माहिती पडेल'

  16:38 (IST)

  कॉमनवेल्थमध्ये भारताची दमदार कामगिरी
  बॅडमिंटनपटू लक्ष सेन अंतिम फेरीत दाखल
  सिंगापूरच्या जेसन तेहचा केला पराभव

  कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स