LIVE Updates : ठाकरेंना आणखी एक धक्का, शिवसेनेच्या पहिल्या आमदारांची मुलगी शिंदे गटात

कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | September 27, 2022, 22:25 IST |  Mumbai, India
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:7 (IST)

  VIDEO : खासदार नवनीत राणा गरब्यात रमल्या, मनसोक्त घेतला आनंद

  21:23 (IST)

  शिवसेना पुन्हा निवडणूक आयोगाकडे दाद मागणार
  शिंदे समर्थकांची कागदपत्रं तपासण्याची मागणी - सूत्र
  ठाकरे समर्थक निवडणूक आयोगाकडे करणार मागणी
  निवडणूक आयोगाला लेखी पत्र देण्याची शक्यता - सूत्र

  20:38 (IST)

  महाराष्ट्राची पर्यटन पुरस्कारांमध्ये बाजी
  महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार
  दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार राज्याला प्रदान

  19:35 (IST)

  भाजप नेत्या पंकजा मुंडेंचं मोठं विधान
  'मी जनतेच्या मनात असेन तर...'
  मोदीही मला हरवू शकणार नाहीत - पंकजा
  'नरेंद्र मोदींनी देशातील वंशवाद संपवला'
  मीसुद्धा वंशवादाचं प्रतीक आहे - पंकजा मुंडे

  19:23 (IST)

  नोटबंदीसंदर्भात उद्या महत्त्वपूर्ण सुनावणी
  सुप्रीम कोर्टात 6 वर्षांनंतर होणार सुनावणी
  2016 ला खटला घटनापीठाकडे केलेला वर्ग

  19:21 (IST)

  नोटबंदीबाबत उद्या महत्त्वपूर्ण सुनावणी
  सर्वोच्च न्यायालयात 6 वर्षानंतर होणार सुनावणी
  16 डिसें. 2016 ला खटला घटनापीठाकडे वर्ग केला होता

  19:13 (IST)

  राज्यभरात शारदीय नवरात्रोत्सव उत्साहात
  3 दिवस रात्री 12 पर्यंत दांडिया-गरबा खेळता येणार
  शनिवार, सोमवार, मंगळवारी रात्री 12 पर्यंत मुभा
  राज्य सरकारनं घेतला निर्णय - मुख्यमंत्री शिंदे

  19:9 (IST)

  केंद्रीय मंत्री परिषदेची उद्या महत्त्वाची बैठक
  पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक
  मंत्रिमंडळातील सर्व सदस्य राहणार उपस्थित
  केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री बैठकीला हजर राहणार

  19:3 (IST)

  गडचिरोली - मूलचेरा तालुक्यातील शांतीग्राम इथं संतप्त जमावानं 10 ट्रक पेटवले, अपघात घडल्यानं महिलेचा झाला होता मृत्यू, पर्यायी रस्ता तयार करून वाहतूक करण्याची नागरिकांची मागणी होती प्रलंबित

  18:56 (IST)

  जखमी गोविंदा प्रथमेश सावंतला 5 लाखांची मदत
  मुख्यमंत्री शिंदेंकडून वैयक्तिकरीत्या मदत जाहीर
  प्रथमेश करीरोडच्या साईभक्त मंडळातील गोविंदा
  दहीहंडीचे थर रचताना प्रथमेश झाला होता जखमी
  प्रथमेशवर सध्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू
  नरेश म्हस्केंकडून प्रथमेशची भेट घेऊन विचारपूस
  प्रथमेश सावंतला 5 लाखांची मदत केली सुपूर्द

  कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स