LIVE Updates : पुणे : संत साहित्याचे अभ्यासक रामचंद्र देखणे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | September 26, 2022, 22:32 IST |  Mumbai, India
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  21:29 (IST)

  पीएफआयशी संबंधित आणखी एकाला अटक
  एटीएसकडून आरोपी मोहम्मद अलीला अटक

  20:43 (IST)

  'आनंद दिघेंनी सुरू केलेला नवरात्रोत्सव उत्साहात'
  आजचा दिवस अतिशय आनंदाचा - मुख्यमंत्री
  हा नवरात्रोत्सव जगभर प्रसिद्ध - एकनाथ शिंदे
  चंपासिंह थापा मध्ये मला येऊन भेटले होते - शिंदे
  'बाळासाहेबांना हे आवडलं नसतं असं थापा बोलले'
  'सत्तेसाठी जी तडजोड झाली त्यामुळे दुखावले गेले'
  बाळासाहेब आणि थापा एक वेगळं समीकरण - शिंदे
  'थापांवरील आरोप हा नेपाळी समाजाचा अपमान'
  त्याचा जाहीर निषेध करतोय - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  19:45 (IST)

  कोल्हापूर - अंबाबाईच्या भक्तांसाठी मोठी बातमी
  पेड पास, VIP दर्शनाला अंबाबाई मंदिरात बंदी
  याचिकेवरील सुनावणीत दिवाणी न्यायालयाचे आदेश

  19:37 (IST)
  मला वाटतं तानाजी सावंतांचं अपूर्ण बोलणं घेतलेलं आहे, सावंतांनी मराठा आंदोलनात सातत्यानं मदत केली, सहकार्य केलं, मराठा समाजाच्या हितासाठी त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं, ही गोष्ट खरी आहे भाषणाच्या ओघात अशा प्रकारचा चुकीचा शब्द गेला, त्यासंदर्भात त्यांनी माफी मागितलीय, दिलगिरी व्यक्त केली आहे, राजकारण करू नये - प्रवीण दरेकर
   
  19:37 (IST)

  बेरोजगार तरुणांसाठी सरकारकडून गांभीर्यानं काम सुरू, बेरोजगारांना काम देण्याचं काम शिंदे-फडणवीस सरकार करेल - प्रवीण दरेकर

  19:37 (IST)
  शिवभोजन थाळी रद्द करणार अशा प्रकारचा निर्णय झाला नाही, शिवभोजन थाळीसंदर्भात अनेक चुकीची नावं, बोगस लाभार्थी अशा गोष्टी सरकारच्या कानावर आल्यात, मंत्री रवींद्र चव्हाणांनी घेतला आढावा, मंत्रिमंडळ बैठकीत विषय ठेवून त्याबाबत निर्णय होईल - प्रवीण दरेकर
   
  19:14 (IST)

  शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या वाहनावरील हल्ला प्रकरण, शिवसेनेच्या 10 कार्यकर्त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी

  18:48 (IST)
  10 यू-ट्यूब चॅनल, 45 हून अधिक व्हिडिओंवर बंदी, धार्मिक समुदायाविरोधात द्वेषपूर्ण भाषण केल्याचा ठपका
   
  18:41 (IST)

  राजस्थानमधील राजकीय नाट्याबाबत मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन यांनी घेतली सोनिया गांधींची भेट, सोनियांनी राजस्थानमधील घटनाक्रम लिखित स्वरूपात मागितला, काँग्रेस नेत्यांकडून उद्या लेखी अहवाल सादर केला जाणार, मुख्यमंत्री कोण याबाबतचा अंतिम निर्णय सोनिया गांधी घेणार

  17:59 (IST)

  '2 दिवस गरब्याला रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी'
  'तिसऱ्या दिवसासाठीही प्रस्ताव विचाराधीन'
  अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार - देवेंद्र फडणवीस

  कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स