LIVE Updates : गोंदिया : शासकीय आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकासह क्रीडा शिक्षकांचं निलंबन

कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | September 25, 2022, 21:53 IST |  Mumbai, India
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:36 (IST)

  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी टी-20
  भारताचा ऑस्ट्रेलियावर शानदार विजय
  ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्स राखून केला पराभव
  टी-20 मालिका भारतानं 2-1 अशी जिंकली

  22:6 (IST)

  मुंबईच्या अंधेरी भागात काही घरं कोसळली
  अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी
  मेट्रो पिलरचं काम सुरू असताना घटना

  21:26 (IST)

  दुर्गराज रायगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ पिंडदानाचा प्रकार घडल्यानंतर संभाजीराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

  20:55 (IST)

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
  2014 मध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळणार होतं - शिंदे
  'पण ते मला मिळणार असल्यानं पक्षानं नाकारलं'
  दै.'लोकसत्ता'ला दिलेल्या मुलाखतीत शिंदेंचा दावा

  20:29 (IST)

  'शिवाजी पार्क मेळाव्यासाठी सत्तेचा वापर केला नाही'
  कोणावर टीकेसाठी आमचा दसरा मेळावा नसेल - केसरकर
  'आमच्या दसरा मेळाव्यात कोणावरही टीका करणार नाही'
  विकासावर दसरा मेळाव्यात लोकांशी बोलू - दीपक केसरकर

  19:52 (IST)

  पीएफआयविरोधात ठाण्यात मनसे आक्रमक
  पाकिस्तान मुर्दाबादची घोषणाबाजी, निदर्शनं
  मनसैनिकांकडून पाकचा झेंडा जाळून निषेध

  19:19 (IST)

  अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात आगीचं प्रकरण
  आगीच्या घटनेची राज्य सरकारकडून गंभीर दखल
  जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती
  24 तासांत अहवाल सादर करा, फडणवीसांचे आदेश

  19:19 (IST)

  अमरावतीच्या अंजनगाव सुर्जीमधील घटना
  शिंदे समर्थक संतोष बांगर यांच्या ताफ्यावर हल्ला
  गद्दार आमदार म्हणत वाहनावर बुक्क्यांनी मारहाण
  ठाकरे समर्थकांनी हल्ला केल्याचा बांगरांचा आरोप

  18:43 (IST)

  'पाकिस्तान झिंदाबाद' घोषणाबाजीचं प्रकरण
  पीएफआय आंदोलन आयोजकांवर गुन्हा दाखल
  पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
  कलम 153, 109, 120 'ब' अंतर्गत कारवाई

  18:40 (IST)

  Video : मोदीजी समाजाची जबाबदारी माझ्या खांद्यावर देऊ इच्छितात, निवडणूक लढण्याबाबत काय म्हणाली राखी सावंत?

  कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स