LIVE Updates : लोकलच्या महिला डब्यात पुरुष घुसला तर काय कराल? 1512 हा नंबर लक्षात ठेवा!

आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या जनआक्रोश मोर्चाला शिवसेनिकांची तुफान गर्दी बघायला मिळत आहे.

 • News18 Lokmat
 • | September 24, 2022, 22:07 IST |  Mumbai, India
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:5 (IST)

  मुंबई लोकलमध्ये एक माथेफिरू अर्धनग्न अवस्थेत फिरत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यानंतर पोलिसांनी सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. लोकलमध्ये काही घटना घडली तर महिलांनी 1512 या क्रमांकावर कॉल करावा.

  22:5 (IST)

  मुंबई लोकलमध्ये एक माथेफिरू अर्धनग्न अवस्थेत फिरत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यानंतर पोलिसांनी सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. लोकलमध्ये काही घटना घडली तर महिलांनी 1512 या क्रमांकावर कॉल करावा.

  20:44 (IST)

  पालकमंत्र्यांच्या नावांची यादी जाहीर
  फडणवीस नागपूर, वर्धा, भंडाऱ्याचे पालकमंत्री
  अमरावती, अकोला, गडचिरोलीही फडणवीसांकडे
  देवेंद्र फडणवीसांकडे 6 जिल्ह्यांची जबाबदारी
  राधाकृष्ण विखे-पाटील - अहमदनगर, सोलापूर
  सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर, गोंदियाचे पालकमंत्री
  विजयकुमार गावित - नंदुरबार, दादा भुसे - नाशिक
  महाजनांवर धुळे, लातूर, नांदेडची जबाबदारी
  गुलाबराव पाटलांकडे बुलढाणा, जळगावची जबाबदारी
  संजय राठोड यवतमाळ, वाशिमचे पालकमंत्री
  सुरेश खाडे - सांगली, संदिपान भुमरे - औरंगाबाद
  उदय सामंतांकडे रत्नागिरी, रायगडचं पालकमंत्रिपद
  तानाजी सावंत यांच्याकडे परभणी, उस्मानाबाद
  रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग, सत्तार- हिंगोली
  दीपक केसरकर मुंबई शहर, कोल्हापूरचे पालकमंत्री
  जालना, बीडचं पालकमंत्रिपद अतुल सावेंकडे
  शंभूराज देसाई सातारा आणि ठाण्याचे पालकमंत्री
  मंगलप्रभात लोढा मुंबई उपनगरचे पालकमंत्री

  18:45 (IST)

  पुणे - PFI आंदोलनात 'पाकिस्तान जिंदाबाद' घोषणा
  सरकारनं यांना वेळीच ठेचलं पाहिजे - राज ठाकरे
  'PFI'ची कीड समूळ नष्ट करा, राज ठाकरेंची मागणी

  18:31 (IST)

  संजय पांडे ईडीकडून सीबीआयच्या ताब्यात
  NSE फोन टॅपिंग प्रकरणात कारवाई
  संजय पांडेंना 4 दिवसांची सीबीआय कोठडी
  संजय पांडे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त

  18:26 (IST)

  पुण्याच्या वडगावमध्ये युवासेनेचं आंदोलन
  प्रकल्प गुजरातला गेल्यानं जनतेत रोष - आदित्य
  आतापर्यंत 3 प्रकल्प राज्याबाहेर - आदित्य ठाकरे
  मुख्यमंत्री स्वत:च्या कामांसाठी दिल्लीला - आदित्य
  'महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री दिल्लीला जात नाहीत'
  'गटात कोण येतंय याकडेच खोके सरकारचं लक्ष'
  हे घटनाबाह्य, खोके सरकार - आदित्य ठाकरे
  'प्रकल्पावरून केंद्र, गुजरातला दोष देणार नाही'
  हा दोष नाकर्त्या खोके सरकारचा - आदित्य ठाकरे
  खरे मुख्यमंत्री कोण हेच समजत नाही - आदित्य
  'तुम्ही खोके घेऊन ओके, पण रोजगाराचं काय?'
  'आम्हाला खोके नको, महाराष्ट्र ओके करून दाखवा'
  हे सरकार नाही सर्कस, आदित्य ठाकरेंची टीका
  'आर्थिक राजधानी असलेला महाराष्ट्र मागे पडतोय'
  पुढचा जनआक्रोश मोर्चा संभाजीनगरमध्ये - आदित्य

  17:35 (IST)

  आदित्य ठाकरेंचा वेदांता प्रकल्पावरुन राज्य सरकारवर निशाणा: 

  हा मोर्चा एक वेगळा रोष आणि एक वेग राग आपल्या मनामध्ये आहे. मी इथे येत असताना विचार करत होतो, आज आपण इथे सगळे जमलो आहोत, आपण महाविकास आघाडी सरकारमध्ये असतो तर वेदांता प्रकल्प झाला असता आणि आज इथे जल्लोष झाला असता. प्रत्येक पक्षाचे कामगार सेना आहेत. तुम्ही खोके घेवून गेलात म्हणजे सरकारमध्ये तुम्हाला काहीतरी मिळेल. पण महाराष्ट्राला काय मिळालं? ड्रोन बाजूला करा. ते महाराष्ट्राच्या खोके सरकार सारखेच आहेत. फक्त आवाज जास्त आहे. मी साधं ट्विट टाकलं होतं. अग्रवाल यांनी गुजरातच्या मंत्र्यांचं कौतुक केलं होतं. आणि वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याचं घोषित केलं होतं. प्रकल्प गुजरातमध्ये गेला याचा राग नाही. पण महाराष्ट्रात जास्तीत जास्त उद्योजक राहतात. देशाची प्रगती व्हायची असेल तर प्रत्येक राज्यात रोजगाराची संधी निर्माण व्हायला हवा. पण जो प्रकल्प शंभर टक्के महाराष्ट्रात या तळेगावातच येणार असं ठरलेलं असताना सरकार बदलल्यावर हा प्रकल्प गुजरातलाच गेलाच कसा? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. 

  17:12 (IST)

  - पुणे जिल्ह्यातील तळेगावात युवासेना प्रमुख यांच्या नेतृत्वात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला
  - वेदांता प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने आदित्य ठाकरे आक्रमक
  - आदित्य ठाकरेंची राज्य सरकारवर सडकून टीका
  - आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वातील जनआक्रोश मोर्चाला शिवसैनिकांची प्रचंड गर्दी

  17:0 (IST)

  - सुप्रीम कोर्टाच्या घटनात्मक खंडपीठापुढे येत्या 27 सप्टेंबरला महाराष्ट्रातील राजकीय नाट्यावर सुनावणी
  - सुनील प्रभू विरुद्ध राज्यपाल याचिकेवर होणार सुनावणी
  - सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश ललित यांच्या पाच सदस्यीय खंडपीठापुढे होणार सुनावणी

  11:58 (IST)

  'PFIच्या निशाण्यावर मोदींचा पाटणा दौरा'
  भाजप खासदार मनोज तिवारींचा आरोप
  'मोदींच्या दौऱ्यादरम्यान PFIचा मोठा कट'
  अटक केलेल्यांच्या चौकशीत मोठा खुलासा

  कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स