LIVE Updates : शिवसेनाला आपला पक्ष मांडण्याकरिता अतिरिक्त 4 दिवसांची मुदत

कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | September 22, 2022, 21:49 IST
  LAST UPDATED 9 DAYS AGO

  हाइलाइट्स

  22:19 (IST)

  केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांची चंद्रपुरात महत्त्वाची घोषणा, चंद्रपुरात 20 टन वार्षिक क्षमतेची पेट्रोलियम रिफायनरी उभारणार

  21:21 (IST)
  नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर 27 सप्टेंबरला सुनावणी, ईडीच्या वतीनं मलिकांच्या वैद्यकीय तपासणीसाठी समिती स्थापन करण्याकरिता न्यायालयात अर्ज
   
  21:12 (IST)

  धक्कादायक Video : कॉलेजच्या मुलांचा भररस्त्यात राडा; कारने दोघांना उडवलं

  20:21 (IST)

  जेएसडब्ल्यू कोकणात करणार सुमारे 4200 कोटींची गुंतवणूक, जेएसडब्ल्यूसोबत उद्योग विभाग लवकरच करणार सामंजस्य करार, पेण इथं होणार 960 मेगावॅटचा पीएसपी प्रकल्प - उद्योगमंत्री उदय सामंत

  20:16 (IST)

  औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण, राज्य सरकारच्या या निर्णयावर आव्हान याचिका, मुंबई हायकोर्टानं फेटाळली याचिका, औरंगाबाद खंडपीठाकडे दाद मागा, हायकोर्टाकडून याचिककर्त्याला निर्देश

  19:43 (IST)

  रस्त्यांवरील खड्डे प्रश्नावर मुंबई हायकोर्ट गंभीर, खड्डेमय रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी योजना सादर करण्याचे मनपा आयुक्तांना आदेश, मुंबईतील खराब खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती कशी करायची याचा रोडमॅप तयार करा - हायकोर्ट

  19:39 (IST)

  Video : एक्स्प्रेसवेवर अक्षरश: तळं; अख्खी बाईक गेली पाण्याखाली

  19:23 (IST)

  रुपी बँक प्रशासकांना तात्पुरता दिलासा, मुंबई हायकोर्टाकडून परवाना रद्दच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती, 17 ऑक्टोबरला सुनावणी, आरबीआयनं रद्द केलंय रुपी बँकेचं लायसन्स

  19:19 (IST)
  मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा विदर्भ दौरा संपला, राज ठाकरे 5 दिवस विदर्भ दौऱ्यावर होते, दौऱ्यात राज ठाकरेंनी नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्याला भेट दिली, पक्ष पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद, संघटनात्मक बांधणी आणि आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा विदर्भ दौरा होता
   
  19:18 (IST)

  राज ठाकरेंकडून नागपूर शहराची आणि ग्रामीणची मनसे कार्यकारिणी बरखास्त, विदर्भातील अनेक जिल्ह्यांत मनसेमध्ये अनेक मोठे फेरबदल

  कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स