LIVE Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी उत्सवाच्या शुभेच्छा

कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | August 18, 2022, 23:27 IST
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:56 (IST)

  मुंबईची जीवनवाहिनी असणाऱ्या 'बेस्ट'ला अधिक बळकट करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, बेस्टच्या सर्व कर्मचाऱ्यांना महापालिका त्यांच्या मागण्यांसंदर्भातील आवश्यक तो निधी लवकरच वितरित करेल - मुख्यमंत्री

  19:59 (IST)

  NCPच्या 5 नेत्यांची लवकरच ईडीकडून चौकशी?
  भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकरांचं वक्तव्य
  लवासा, जलसंपदा विभागातील भ्रष्टाचार प्रकरण
  राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याचा समावेश - निंबाळकर

  19:46 (IST)

  विधान परिषदेवर 12 आमदार नियुक्तीचा मुद्दा
  महाविकास आघाडीच्या वतीनं याचिका दाखल
  नियुक्तीची याचिका मुंबई हायकोर्टात सध्या प्रलंबित
  हस्तक्षेप याचिकेच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टात दाखल
  राज्यघटनेच्या तरतुदीनुसार नियुक्ती करा - याचिका

  19:3 (IST)

  रायगड - हरिहरेश्वरमधील संशयास्पद बोट प्रकरण
  संशयास्पद बोटप्रकरणी गुन्हा दाखल होणार
  ATS गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती

  18:57 (IST)

  - राजू श्रीवास्तव यांची प्रकृती स्थिर

  - गेल्या एका तासापासून हृदयाचे ठोके स्थिर असल्याची माहिती 

  - या आधी खूप चढ-उतार होत होते

  18:36 (IST)

  बारामती - कवी मोरोपंत हायस्कूलसमोरची घटना
  शाळकरी मुलीच्या वडिलांवर हल्ला, जागीच मृत्यू
  अल्पवयीन मुलांनी धारदार शस्त्रांनी केले वार

  18:36 (IST)

  बारामती - कवी मोरोपंत हायस्कूलसमोरची घटना
  शाळकरी मुलीच्या वडिलांवर हल्ला, जागीच मृत्यू
  अल्पवयीन मुलांनी धारदार शस्त्रांनी केले वार

  18:33 (IST)

  आझाद मैदानात विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि संघटनांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली भेट, विधिमंडळ परिसरातच सर्व आंदोलकांना बोलावून मुख्यमंत्र्यांनी केली चर्चा, सर्व आंदोलकांना मुख्यमंत्र्यांकडून दिलासा

  17:57 (IST)

  - दहीहंडीला खेळाचा दर्जा, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, गोविंदांना होणार फायदा
  - "गोविंदा उत्सवाचा क्रीडा प्रकारात समावेश करुन प्रो गोविंदा म्हणून स्पर्धा राबवाव्यात. राज्य शासनाकडून या स्पर्धा चालू केल्यानंतर बक्षीसं हे राज्य शासनाकडून मिळतील. त्याचप्रमाणे इतर खेळांप्राणे या खेळातील गोविंदांना देखील शासकीय नोकरीत पाच टक्क्यांच्या कोठ्यातून लाभ मिळेल. तसेच शासनाच्या इतर योजनांचा लाभ मिळेल", अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

  17:56 (IST)
  दहीहंडी उत्सवातील गोविंदांना विम्यासोबतच आता नोकऱ्यांमध्ये 5 टक्के आरक्षणाचाही लाभ मिळणार, प्रताप सरनाईकांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता
   
  कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स