LIVE Updates : राज्‍यात शासकीय कार्यालयांमध्‍ये 'हॅलो'ऐवजी 'वंदे मातरम्'नं संभाषणाला होणार सुरुवात

कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | August 14, 2022, 23:56 IST
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  21:39 (IST)

  जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात चकमक
  कांद्रा हिल भागात दहशतवाद्यांसोबत चकमक

  20:35 (IST)

  राज्‍यात शासकीय कार्यालयांमध्‍ये 'हॅलो'ऐवजी 'वंदे मातरम्'नं संभाषणाला होणार सुरुवात, सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारांची घोषणा

  20:27 (IST)

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ठाणे पोलिसांना आदेश
  'शिवसेना शाखेवर येण्यास कोणालाही मज्जाव नको'
  सर्व शिवसैनिकच आहेत - एकनाथ शिंदे
  सर्वांना झेंडावंदन करायचा अधिकार - शिंदे
  दिघेसाहेब सर्व ठाणेकरांचे होते - एकनाथ शिंदे
  सर्व एकत्रित येऊन तिरंगा फडकवूया - शिंदे

  20:23 (IST)

  राष्ट्रीय स्तरावरील सन्मान महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून राष्ट्रपती पोलीस पदक, सन्मान पटकावणाऱ्यांचं अभिनंदन

  20:10 (IST)

  नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव इथं विद्युत तारा पडून 11 दुभत्या जनावरांचा मृत्यू

  18:24 (IST)

  आमचे सगळे सहकारी सामंजस्य असून अधिवेशनानंतर मुख्यमंत्री शिंदे मेरिट बघून पुढचा विस्तार करतील - उदय सामंत

  17:34 (IST)

  खात्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करू - फडणवीस
  खातेवाटपावरून आमच्यात वाद नाही - फडणवीस

  16:57 (IST)

  राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद् व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग

  राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती


  राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर - राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, सुधीर मुनगंटीवार - वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय, चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री, डॉ.विजयकुमार गावित - आदिवासी विकास, गिरीश महाजन - ग्रामविकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा व स्वच्छता, दादा भुसे - बंदरे व खनिकर्म, संजय राठोड - अन्न व औषध प्रशासन, सुरेश खाडे - कामगार
  संदीपान भुमरे - रोजगार हमी योजना व फलोत्पादन, उदय सामंत -  उद्योग, प्रा.तानाजी सावंत - सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, रवींद्र चव्हाण - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व  नागरी पुरवठा आणि  ग्राहक संरक्षण, अब्दुल सत्तार - कृषी, दीपक केसरकर - शालेय शिक्षण व मराठी भाषा, अतुल सावे - सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण, शंभुराज देसाई - राज्य उत्पादन शुल्क, मंगलप्रभात लोढा - पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास

  16:34 (IST)

  - विनायक मेटे यांचं पार्थिव घरातून बाहेर आणलं
  - कार्यकर्त्यांना दर्शनासाठी घराखाली काही वेळ ठेवण्यात येतंय
  - मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीसुद्धा विनायक मेटे यांचा अखेरचा निरोप घेतला

  16:30 (IST)

  मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पोहरादेवीत जंगी स्वागत
  हजारो बंजारा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन

  कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स